
वीजेच्या तारांमध्ये अडकलेल्या जखमी पक्ष्याला वाचविण्यासाठी सुरतमध्ये जैन समाजाने हॅलीकॉप्टर मागवले होते, अशा माहितीसह एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. सुरतमध्ये खरोखरच अशी काही घटना घडली आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
वीजेच्या तारांमध्ये अडकलेल्या जखमी पक्ष्याला वाचविण्यात आल्याचा हा व्हिडिओ सुरतमधील आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही शोध घेतला. त्यावेळी युटुयुबवर एक ऑगस्ट 2015 रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ दिसून आला. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याचा उल्लेख मात्र नव्हता.
हा व्हिडिओ जुना असल्याचे आता स्पष्ट झाले होते, मात्र तो कुठला आहे हे मात्र स्पष्ट झाले नव्हते. त्यानंतर आम्हाला ब्रिटनमधील मिरर या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरील 26 सप्टेंबर 2013 रोजीचे वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार अमेरिकेतील वर्जेनियातील समुद्रकिनाऱ्यावर वीजेच्या तारांमध्ये अडकलेल्या सिगल पक्षाची सुटका करण्यात आली. या पक्षाची सुटका करतानाचा हा व्हिडिओ आहे.
मिररच्या संकेतस्थळावरील वृत्त / Archive
यातून हे स्पष्ट झाले की हा व्हिडिओ सध्याचा नसून जुना म्हणजेच 2013 मधील आहे. तो अमेरिकेतील असून भारतातील नाही.
निष्कर्ष
ही घटना सुरतमधील नसून अमेरिकेत आहे. हा व्हिडिओ देखील जुना म्हणजेच 2013 मधील आहे.

Title:जखमी पक्ष्याला वाचविण्याचा हा व्हिडिओ सुरतमधील आहे का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
