
#पुरस्थिती मुळे प्रत्येक बालकांचे आरोग्य धोक्यात आहे महाराष्ट्र संतापलेला आहे आणि मुख्यमंत्री,महिला #बालकल्याण मंत्री व विनोद तावडे हास्यविनोद करण्यात दंग आहेत…, अशी माहिती Balaji Dahiphale यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे
तथ्य पडताळणी
पंकजा मुंडे यांचे हे छायाचित्र नेमके कधीचे आहे हे शोधण्यासाठी हे छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम दिसून आला.
या परिणामात पंकजा मुंडे यांचे एक व्हेरिफाईड ट्विटर खात्यावरील एक ट्विट आम्हाला दिसून आले. या ट्विटमध्ये इंग्रजीत म्हटले आहे की, पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित चहापानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रीमंडळातील अन्य सहकार्यांसोबत… हे ट्विट 17 जुलै 2016 रोजीचे आहे.
पंकजा मुंडे यांच्या व्हेरिफाईड फेसबुक खात्यावरही तुम्ही हे फोटो पाहू शकता.
यातून हे छायाचित्र 2019 मधील नसून 3 वर्षापुर्वीचे म्हणजे 2016 मधील असल्याचे स्पष्ट होत आहे.
निष्कर्ष
महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या हास्यविनोद मग्न असल्याचे हे छायाचित्र सध्याच्या पुरपरिस्थितीतील म्हणजेच 2019 मधील नसून 2016 मधील पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येचे आहे. त्यामुळे पोस्टमधील दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे.

Title:Fact Check : पुरपरिस्थिती गंभीर असताना नेतेमंडळी हास्यविनोदात मग्न आहेत का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
