जगावर कोरोनाचे संकट असतानाच अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच नासाने सुर्यमालेतील 13 वी रासेची जागा जगासमोर आणली आहे. या नवीन राशीचे नाव ऑफिउकस असे आहे, असा दावा समाजमाध्यमात काही जण करत आहेत. हा दावा खरा आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.07.24-18_20_47.png

फेसबुक पोस्ट / संग्रहण

तथ्य पडताळणी

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच नासाने 13 वी रास शोधून काढली का, याचा शोध घेतला. त्यावेळी जगप्रसिध्द फोर्ब्स या मासिकांच्या संकेतस्थळावर 17 जुलै 2020 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार नासाने अशी कोणताही रास शोधून काढलेली नाही. नासाने ही बाब नाकारली असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

screenshot-www.forbes.com-2020.07.24-19_05_52.png

फोर्ब्सच्या संकेतस्थळावरील वृत्त / संग्रहित

जगप्रसिध्द टाईम (संग्रहित) या मासिकाच्या संकेतस्थळावरही 17 जुलै 2020 रोजी हे वृत्त प्रसिध्द झाले असल्याचे दिसून आले. नासाने याबाबत ट्विट केले असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे नासाच्या ट्विटर खात्यास भेट दिली. त्यावेळी खालील ट्विट दिसून आले. राशीबाबतच्या या अफवा दर काही वर्षांनी पसरतात. या राशी आम्ही बदलत नाही, असे नासाने याबाबत म्हटल्याचे दिसून येते.

https://twitter.com/NASA/status/1283918088723935234?

संग्रहित

नासाच्या संकेतस्थळावरही याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली असल्याचे दिसून येते. यातही नासा कोणत्याही राशी बदलत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खगोलशास्त्र आणि ज्योतिष या दोन्ही बाबी भिन्न असल्याचे नासाने म्हटले आहे. नासाच्या संकेतस्थळावर आपण ही माहिती सविस्तरपणे वाचू शकता.

screenshot-nasa.tumblr.com-2020.07.24-19_50_07.png

नासाच्या संकेतस्थळावरील माहिती / संग्रहित

निष्कर्ष

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच नासाने 13 वी रास शोधून काढल्याचे असत्य आहे.

Avatar

Title:अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच ‘नासा’ने 13 वी रास शोधून काढलेली नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False