
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय, अहमदनगर येथील सामान्य रुग्णालय, परभणी येथील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा म्हणून व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बारकाईने पाहिला. या व्हिडिओ एका ठिकाणी कर्मचाऱ्याच्या कपड्यावर जिल्हा चिकित्सालय, झांबुआ (म. प्र.) असे लिहिले असल्याचे दिसून आले. व्हिडिओतील हा भाग आम्ही खाली दिला आहे.

त्यानंतर आम्ही युटुयूबवर याबाबतची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सीबी लाईव्ह या स्थानिक वृत्तवाहिनीचा 23 मार्च 2020 एक व्हिडिओ दिसून आला. कोरोना रुग्ण सापडल्यावर त्यावर कसे उपचार करायचे याचे प्रात्यक्षिक झांबुआ येथील जिल्हा रुग्णालयात घेण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. यावेळी अशा स्थितीसाठी वैद्यकीय कर्मचारी किती तयार आहेत याचा आढावा देखील घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या जिल्ह्यात तोपर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण तोपर्यंत सापडलेला नव्हता.
निष्कर्ष
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा म्हणून समाजमाध्यमात पसरत असलेला हा व्हिडिओ मॉकड्रीलचा आहे. तो महाराष्ट्रातील नसून मध्य प्रदेशमधील झांबुआ जिल्हा रुग्णालयातील आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा असत्य आहे.

Title:COVID 19 : मध्यप्रदेशातील मॉक ड्रीलचा व्हिडिओ महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
