साबरमती नदी अहमदाबाद गुजरात येथे गणेश विसर्जनाला बंदी केल्याने जनेतेने फूटपाथ वरच गणपतींचे विसर्जन केले, अशी माहिती असलेला एक व्हिडिओ सुदाम शिनगारे यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक पोस्ट / Archive 

तथ्य पडताळणी

साबरमती नदी अहमदाबाद गुजरात येथे गणेश विसर्जनाला बंदी केल्याने जनेतेने फूटपाथ वरच गणपतींचे विसर्जन केले का? हा व्हिडिओ कधीचा आहे हे शोधण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही छायाचित्रे घेऊन ती रिव्हर्स इमेज सर्च करुन पाहिली. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला. या परिणामानुसार एके ठिकाणी 13 डिसेंबर 2018 ही तारीख दिसून आली. यातून हा व्हिडिओ जुना असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर आम्ही आमचा तपास आणखी पुढे नेला. त्यानंतर आम्ही अहमदाबादचे महापालिका आयुक्त विजय नेहरा यांच्या ट्विटर खात्यास भेट दिली. त्यावेळी त्यांनी ट्विट करत हा व्हिडिओ गणेश विसर्जनाचा नसुन जुना असल्याचे स्पष्ट केले आहे. आपण त्यांनी याबाबत केलेले ट्विट खाली पाहू शकता.

https://twitter.com/vnehra/status/1170918357299793920

https://twitter.com/vnehra/status/1170918357299793920

या देवीच्य मुर्त्यांचे पावित्र्य जपत नंतर त्यांचे विसर्जनही करण्यात आले आहे. साबरमती नदीचे पाणी दुषित होऊ नये आणि तेथे सुरु असलेली विकासकामे सुरळित व्हावी यासाठी तेथील महापालिकेने केलेल्या आवाहनाला तेथील नागरिकांनी दिलेला हा प्रतिसाद होता. सध्या अहमदाबादमध्ये गणेश विसर्जनासाठी 61 कुंड बनविण्यात आले आहेत. तेथील गणेश विसर्जन 12 डिसेंबर रोजी होणार आहे.

निष्कर्ष

हा व्हिडिओ गणेश विसर्जनाचा नसून तो जुना देवी विसर्जनाचा आहे. नदीचे पावित्र्य राखण्यासाठी महापालिकेने आवाहन केल्यावर नागरिकांनी प्रतिसाद देत येथे या मुर्त्या ठेवल्या होत्या. त्याचे पावित्र्य राखत नंतर त्याचे विसर्जन करण्यात आले आहे.

Avatar

Title:Fact Check : हा व्हिडिओ अहमदाबादमधील गणेश विसर्जनाचा आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False