Fact : वाहतूक नियंत्रण दिवे वाहून जातानाचा हा व्हिडिओ मुंबईतील नाही

False सामाजिक

सिग्नल वाहून जात असतानाचा एक व्हिडिओ फॅक्ट क्रेसेंडोला प्राप्त झाला आहे. हा व्हिडिओ मुंबईतील आहे का, अशी विचारणा या व्हिडिओबाबत करण्यात आली आहे. फेसबुकवरही हा व्हिडिओ वेगवेगळ्या दाव्यासह फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोला प्राप्त झालेली विनंती आणि फेसबुकवर असलेली पोस्ट आपण खाली पाहू शकता.

फेसबुक पोस्ट / Archive  

मुंबईत सगळे काही शक्य आहे, इतिहासात पहिल्यादाच सिग्नल रस्ता पार करत आहे, असा एक व्हिडिओ Sheetal Sejpal यांनीही फेसबुकवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याचीही तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी  

मुंबईत खरोखर रस्त्यावरुन वाहतुक नियंत्रण दिवे वाहून गेल्याची एखादी घटना घडली का, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. मुंबईत सिग्नल गेला वाहून असा शब्दप्रयोग करत शोध घेतला असता अशा रेल्वे सिग्नलबाबत अनेक बातम्या दिसून आल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण दिवे वाहून गेल्याचे एकही वृत्त मात्र आम्हाला दिसून आले नाही. 

त्यानंतर आम्ही आमचा तपास आणखी पुढे नेला. आम्हाला युटूयूबवर CGTN या वृत्तवाहिनीचा 12 मे 2018 रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत इंग्रजीत देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, दक्षिण चीनमधील युलिन या शहरात 10 मे 2018 रोजी एक तात्पुरता बसविलेला सिग्नल मुसळधार पावसाने आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. 

या व्हिडिओत दुकानावरील अनेक फलक हे मराठी नव्हे तर चिनी भाषेत असल्याचेही आपण खाली पाहू शकता. 

निष्कर्ष

रस्त्यावरील वाहतुक नियंत्रण दिवे म्हणजेच सिग्नल वाहून गेल्याची ही घटन दक्षिण चीनमधील युलिन या शहरात 10 मे 2018 रोजी घडली आहे. मुंबई शहरात अशी कोणतीही घटना घडलेली नाही. या व्हिडिओत दिसणारे फलकही मराठीत नसून चिनी भाषेत असल्याचे दिसते. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य असल्याचे आढळून आले आहे.

Avatar

Title:Fact : वाहतूक नियंत्रण दिवे वाहून जातानाचा हा व्हिडिओ मुंबईतील नाही

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False