
गोध्रा हत्याकांडातील आरोपी फारूख भाना याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती Sandesh prabhu यांनी PALGHAR REFORMER या पेजवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
गोध्रा हत्याकांडातील आरोपी फारूख भाना याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला दैनिक सामनाच्या संकेतस्थळावरील 20 मार्च 2019 चे वृत्त दिसून आले. या वृत्तात गोध्रा हत्याकांडातील आरोपी याकुब पटालियाला अहमदाबाद न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचे म्हटले आहे. गुजरात उच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2017 मध्ये 11 दोषींच्या फाशीचे रुपांतर जन्मठेपेत केले होते, असे या वृत्तात म्हटलेले आहे. अन्य 20 दोषींची जन्मठेप कायम ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे.
त्यानंतर आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. त्यावेळी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील 9 ऑक्टोबर 2019 चे वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात 11 जणांची फाशी रद्द, सर्व 31 आरोपींना जन्मठेप असे म्हटले आहे.
फारूख भानाविषयी माहिती मिळत नसल्याने आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. त्यावेळी आम्हाला एनडीटीव्हीचे 18 मे 2016 चे एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार फारूख भानाला जवळपास 14 वर्षानंतर अटक करण्यात आली आहे.
फारूख भानाला शिक्षा झाली आहे का? झाली असल्यास काय शिक्षा झाली आहे, हा प्रश्न कायम असल्याने आम्ही आमचा शोध पुढे नेला. त्यावेळी फर्स्टपोस्ट या संकेतस्थळाचे एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तानुसार फारूख भानाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फर्स्टपोस्टने 28 ऑगस्ट 2018 रोजी हे वृत्त दिले आहे.
हिंदूस्थान टाईम्सच्या इंग्रजी संकेतस्थळानेही 27 ऑगस्ट 2018 रोजी याबाबतचे वृत्त दिले असून यात भाना याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचे म्हटले आहे.
आपण गुजरात उच्च न्यायालयाचा यासंदर्भातील निर्णय येथे वाचू शकता.
GJHC240258742011-207निष्कर्ष
ग्रोधा हत्याकांडातील आरोपी फारूख भाना याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला फाशीची सुनावण्यात आलेली नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : गोध्रा हत्याकांडातील आरोपी फारूख भाना याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
