कर्नाटकमध्ये भाजप नेताच्या कारमध्ये ईव्हीएम सापडल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Partly False राजकीय | Political

कर्नाटक विधानसभा निवडणुकीl काँग्रेसने 135 भागांवर विजय मिळवला तर भाजपला 66 जागावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी 10 मे 2023 रोजी कर्नाटकमधील विजापूर जिल्हातील मसाबिनल गावात लोकांनी एक कार अडवून ईव्हीएम मशिनची तोडफोड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की,कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या वाहनामध्ये ईव्हीएम सापडल्याने संतप्त मतदारांकडून यंत्रणांची तोडफोड करण्यात आली.” 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा असून ईव्हिएम मशिन घेऊन जाणारी गाडी भाजप नेत्याची नव्हती.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये महाराष्ट्र टाइम्स लोगो दिसते. व्हिडिओमध्ये लिहिलेले आहे की, “कर्नाटकातील भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हिएम सापडले, मतदारांकडून गोंधळ.”

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स लिहितात की, “VIDEO : कर्नाटकातील भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम सापडलं, मतदारांकडून ईव्हीएमचा चक्काचूर.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्व प्रथम महाराष्ट्र टाइम्सनी खरंच अशी बातमी प्रसारीत केली आहे का? याची पडताळणी केल्यावर तळाले की, व्हायरल बातमी अर्धवट असून खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी 11 मे 2023 रोजी अपलोड केली होती. त्या व्हिडिओमध्ये लिहिलेले होते की, “कर्नाटकातला मतदानाच्या दिवशीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. पोलिसांनी या सर्व प्रकरणावर आता स्पष्टी करण दिले आहे. गैरसमजुतीतून हा प्रकार घडला असे पोलिसांनी सांगितले.”

तसेच महाराष्ट्रा टाइम्सने कॅप्शनमध्ये स्पष्ट केले की, “कर्नाटकमध्ये एका खाजगी गाडीत इव्हीएम सापडल्यामुळे स्थानिकांनी रागात येऊन यंत्रणाची तोडफोड केली. परंतु, व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदान संपायच्या आधीच खाजगी कारमधून ईव्हीएम बाहेर नेत असल्याचा संशय स्थानिकांना आला आणि गैरसमज झाल्याने रागाच्या भरात त्यांनी ईव्हीएम व इरत यंत्रणांची तोडफोड केली. तसेच पोलिसांनी स्पष्ट केले की, निवडणूक अधिकाऱ्यांच्या वाहनातून हे ईव्हीएम नेले जात होते.”

https://www.facebook.com/maharashtratimesonline/videos/549926853998828/?__tn__=%2CO-R

पुढे सदरील माहितीच्या अधारे कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हल्ला झाला त्याच दिवशी पत्रक प्रकाशित केले होते.

या प्रेस नोटमध्ये म्हटले की,  निवडणुकदरम्यान EVM, VVPAT किंवा इतर यंत्रणामध्ये तांत्रिक बिघाड आल्यास त्यांना त्वरित बदलण्यात येत असते. अशाच एका कामासाठी 10 मे 2023 रोजी मल्लपा हनमंतप्पा येराजरी आणि विभाग 5 मधील क्षेत्र अधिकारीसह इतर कर्मचारी बसवना बागेवाडी स्ट्राँगरूम कडून मसाबिनालकडे KA-28/Z-2305 या क्रमांकच्या वाहनामध्ये EVM आणि VVPAT व इतर यंत्रे घेऊन जात होते.

त्यावेळी 100 ते 150 लोकांनी त्यांना व्यंकटेश मंदिराजवळ थांबवले आणि वाहनामध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनासोबत शिवीगाळ केली. तसेच त्यांच्यावर दगडफेक केली. जमावाने EVM मशिनसोबत वाहन आणि इतर यंत्रांचीदेखील तोडफोड केली होती.

मानागुली स्टेशनमध्ये  याप्रकरणी तक्रार दाखल केलेली आहे. या गुन्ह्यात 34 आरोपींचे नावे समोर आली आहेच. संपूर्ण प्रेस नोट येथे पाहू शकतात.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये वाहानत ईव्हीएम मशीन घेऊन जाणारे भाजप नेते नसून ते निवडणूक अधिकारी होते. गैरसमज झाल्याने रागाच्या भरात स्थानिकांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन आणि इतर यंत्राची तोडफोड केली होती. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल झाला होता.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:कर्नाटकमध्ये भाजप नेताच्या कारमध्ये ईव्हीएम सापडल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Partly False