Fact Check : कारल्याची पाने खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचा कर्करोग बरा होतो?

False आरोग्य

कारल्याची पाने खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचा कर्करोग बरा होतो, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक पोस्टमध्ये करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

कारल्याची पाने खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचा कर्करोग बरा होतो का याचा शोध घेण्यासाठी आम्ही कॅन्सरवर मात करण्यासाठी उपाय या कीवर्डद्वारे गुगलवर शोध घेतला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम दिसून आला. यातील एका व्हिडिओत कारल्याच्या रसाने कर्करोग बरा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Archive

दैनिक पुढारीने 4 जानेवारी 2018 रोजी प्रसिध्द केलेल्या एका लेखातही कर्करोगावर उपाय म्हणून रोज कारल्याची पाने खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचा कर्करोग बरा होतो, असा दावा करण्यात आलेला आहे.

Archive

डेली हंटनेही याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्याचे दिसून येते. झी 24 तासनेही कर्करोगाशी सामना करण्यासाठी कारले गुणकारी आहे हे आतापर्यंत अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे. कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी ते शरीराला मदत करते, असे म्हटले आहे.

Archive

कारल्याने कर्करोग नियंत्रणात येतो आणि नष्ट होतो, अशा दोन बाबी आम्हाला विविध ठिकाणी असलेल्या पोस्ट आणि व्हिडिओतून दिसून आल्या. त्यानंतर आम्ही पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाच्या कर्करोग तज्ञ डॉ. शोभा नाग यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी कारल्याचा रस पिल्याने कर्करोग नष्ट होतो, ही बाब असत्य असल्याचे स्पष्ट केले.

निष्कर्ष

वैद्यकीय तज्ञांनी ही बाब स्पष्ट केले आहे की कारल्याने कर्करोग नष्ट होतो, हे असत्य आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत कारल्याचा रस पिल्याने कर्करोग नष्ट होतो ही बाब असत्य असल्याचे आढळून आले आहे.

Avatar

Title:Fact Check : कारल्याची पाने खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचा कर्करोग बरा होतो?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False