काँग्रेस खासदार कुमारी शैलजांच्या पत्रकार परिषदेतील तोडफोडीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

हरियाणातील काँग्रेस खासदार कुमारी शैलजा यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान काही अज्ञात लोकांनी केलेल्या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दावा केला जात आहे की, महालक्ष्मी योजनेअंतर्गत 8 हजार 500 रूपये मागण्यासाठी ही तोडफोड करण्यात आली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, या घटनेचा महालक्ष्मी योजनेशी काही संबंध नाही. 

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये खासदार कुमारी शैलजा पत्रकारांशी बोलत असताना त्या कक्ष बाहेर लोकांच्या गोंधळाचा आवाज येतो आणि खिडकीची काच फुटते.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “खासदार झालात तर 8500 द्या.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी 

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, ही घटना महालक्ष्मी योजनेशी संबंधित नाही.

पंजाब केसरीने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर या पत्रकार परिषदेचे संपूर्ण व्हिडिओ 13 जून 2024 रोजी अपलोड केला होता. 

व्हिडिओमध्ये दिलेल्या महितीनुसार हरियाणामधील फतेहाबाद जिल्ह्याती टोहाना शहरात काँग्रेस खासदार कुमारी शैलजा यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली होती. 

नेमकी घटना काय ?

ईटीव्ही भारतच्या बातमीनुसार हे संपूर्ण प्रकरण पत्रकार परिषदेदरम्यान गेट बंद करण्यात आल्याचे आहे. कुमारी शैलजा पत्रकार परिषदच्या कक्षेकडे जाताच त्यांच्या मागोमाग अनेक नेते आत गेले पण माजी कृषी मंत्री परमवीर सिंह आणि त्यांचे समर्थक बाहेरच राहिले. 

कुमारी शैलजा यांनी पत्रकार परिषद सुरू केली मात्र गेटबाहेर उभे असलेले परमवीर सिंग आणि त्यांचे समर्थक यामुळे नाराज झाले आणि जोर-जोरात गेट ढकलण्यास सुरुवात केली. गेटबाहेरचा गोंधळ पाहून कुमारी शैलजांनी त्यांना थांबण्यास सांगितले परंतु, समर्थकांनी गेट तोडता तोडता सिलबंद दरवाज्याची काच देखील तोडली आणि परमवीर सिंगांना आत पाठवले.

परमवीर सिंग आत आल्यावर गेट आतून बंद असल्याची तक्रार केली. परंतु, कुमारी शैलजा त्यांना सांगितले की, कोणीही गेट बंद केले नसल्याचे सांगितले. तसेच पत्रकारांना सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. घटनेसंबंधित माहिती येथे उपलब्ध आहे.

परंतु, या ठिकाणी कुठे ही महालक्ष्मी योजनेचा उल्लेख करण्यात आला नव्हता. 

महालक्ष्मी योजना

काँग्रेस पक्षाने 5 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी “न्याय पत्र” हा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजना सुरू करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. या योजनेमध्ये गरीब परिवारातील महिलांच्या खात्यात दरमहा 8 हजार 500 रूपये अर्थात वर्षाला एक लाख रूपये देण्याचे आश्वासन दिले होते.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये काँग्रेस खासदार कुमारी शैलजा यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान महालक्ष्मी योजनेची रक्कम मागण्यासाठी लोकांनी तोडफोड केली नव्हती. ही तोडफोड त्यांच्याच पक्षातील कार्यकरत्यांनी केली होती. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:काँग्रेस खासदार कुमारी शैलजांच्या पत्रकार परिषदेतील तोडफोडीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: Misleading