
गरम पाण्याने किंवा व्हिनीगरच्या गरम पाण्याने सकाळ, दुपार, संध्याकाळ गुळण्या केल्यास व गरम पाणी सतत पिल्यास कोरोनाचा विषाणू पळून जातो, अशी माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. विशाल मोरे यांनीही अशीच माहिती पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
सतत गरम पाणी पिल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळास सर्वप्रथम भेट दिली. याठिकाणी आम्हाला जी माहिती दिसून आली. त्यानुसार सतत गरम पाणी पिल्यास अथवा सकाळ, दुपार, संध्याकाळ गुळण्या केल्यास कोरोनाचा विषाणू नष्ट होतो असे म्हटल्याचे दिसून आले नाही. गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होतो. हा दावा देखील असत्य असल्याचे याठिकाणी म्हटले आहे. अती गरम पाण्याने आरोग्यास हानीकारक ठरु शकते, असेही याठिकाणी म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे संकेतस्थळ / Archive
यातून हे स्पष्ट होते की, गरम पाण्यामुळे कोरोना व्हायरस नष्ट होतो. या म्हणण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
निष्कर्ष
गरम पाण्यामुळे कोरोना व्हायरस नष्ट होतो, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. जागतिक आरोग्य संघटनाही याला दुजोरा देत नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:सतत गरम पाणी पिल्याने कोरोना विषाणू नष्ट होतो का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
