आंतरराष्ट्रीय न्यायालयात मुख्य न्यायाधीशपदी दलवीर भंडारी यांची निवड करण्यात आली का ? वाचा सत्य

Partly False राजकीय | Political

लोकसभा निवडणुकीच्या काळात एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला आहे की, आंतरराष्ट्रीय न्यायालयात मुख्य न्यायाधीशपदी दलवीर भंडारी यांची निवड करण्यात आली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य माहितीची विचारणा केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेजमधील बातमी 7 वर्षांपूर्वीची आहे. दलवीर भंडारी हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य आहेत; मुख्यन्यायाधीश नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, “न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड करण्यात आली आहे. दलवीर भंडारींना 193 पैकी 183 मते (प्रत्येक देशातून एक प्रतिनिधित्व) मिळाली आणि त्यांनी ब्रिटनचे न्यायमूर्ती ख्रिस्तोफर ग्रीनवुड यांचा पराभव केला.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, लोकसत्ताने 21 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसारीत केलेल्या बातमीनुसार दलवीर भंडारी यांना सलग दोन वेळा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड करण्यात आली होती.

पहिल्यांदा 2005 ते 2018 त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यभार संभाळला. न्या. भंडारी यांचा कार्यकाळ संपताच भारताने पुन्हा त्यांचे नामांकन जाहीर केले होते. तेव्हा बाराव्या फेरीनंतर ब्रिटन क्रिस्टोफर ग्रीनवुड यांनी माघार घेतल्या भंडारींचा विजय झाला. ते आजदेखील आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यभार पाहतात. 

परंतु, या ठिकाणी दलवीर भंडारी यांची मुख्य न्यायाधीश म्हणून निवड झाली अशी महिती दिलेली नाही. अधिक माहिती येथे वाचू शकता.

अधिक महिती सर्च केल्यावर कळाले की, आंतरराष्ट्रीय न्यायालयात मुख्य न्यायाधीशपद नाही.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटनुसार तीन वर्षांच्या कालावधीसाठी एक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जातात. सध्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात अध्यक्ष नवाफ सलाम आणि उपाध्यक्ष ज्युलिया सेबुटिंडे आहे.

या सुचीमध्ये न्यायाधीश दलवीर भंडारी हे सदस्य आहेत. अधिक महिती आपण येथे पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल मेसेज भ्रामक आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात मुख्यन्यायाधीश पद नसते. दलवीर भंडारी हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य आहेत. भ्रामक दाव्यासह मेसेज व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:आंतरराष्ट्रीय न्यायालयात मुख्य न्यायाधीशपदी दलवीर भंडारी यांची निवड करण्यात आली का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Partly False


Leave a Reply