
सध्या सोशल मीडियावर “छत्रपती शिवाजी महाराज मस्जिद” या नावाने एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत माहिती देण्यात आलेली “छत्रपती शिवाजी महाराज मस्जिद” खरंच आहे का, याबाबत फॅक्ट क्रिसेंडोने केलेली ही सत्य पडताळणी…
सत्य पडताळणी
सोशल मीडियावर छत्रपती संभाजी, शिवाजी महाराज महान मराठा महाराष्ट्रीयन देशभक्त या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होईपर्यंत या व्हिडीओला 58 हजार शेअर आहेत. या व्हिडीओवर एक हजार 900 कमेंटस् आणि 2.3 मिलियन व्हूज आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी या व्हिडीओचा स्क्रिनशॉट घेवून गुगल रिव्हर्स इमेज घेतली असता खालील रिझल्ट समोर आले.
या व्हिडीओत छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते, असे म्हटले आहे. शिवाजी महाराजांनी मशीद बांधण्यासाठी संत याकुबबाबा यांना 653 एकर जमीन दिली होती असा उल्लेख यात आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ शेख सुभान अली यांनी शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानाचा आहे. युट्युबवर शिवरायांचा मुस्लीम मावळा या चॅनलवर हा व्हिडीओ 8 एप्रिल 2018 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये 0.07 सेकंदापासून 59 सेकंदापर्यंत शेख सुभान अली यांनी शिवछत्रपती महाराज मशीदीबद्दल माहिती दिली आहे. याविषयी बोलताना त्यांनी रत्नागिरीतील केळशी गावातील या मशिदीला स्थानिक जामा मशीद म्हणतात, तर इतिहासात या मशीदला शिवाजींची मशीद असे म्हटले जाते असे त्यांनी म्हटले आहे. हा उल्लेख या व्हिडीओत 1.09 ते 1.12 या मिनिटाला आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील मशीद ही रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी गावात आहे. याबद्दल रत्नागिरी टुरिझम या वेबसाइटवर सविस्तर माहिती आणि फोटोज आहेत.
निष्कर्ष : सोशल मीडियावर वायरल होणारा “छत्रपती शिवाजी महाराज मस्जिद” या व्हिडिओतील उल्लेख असणारी छत्रपती शिवाजी महाराज मशीद ही प्रत्यक्षात आहे. त्यामुळे हा व्हिडिओत सांगितलेली माहिती खरी असल्याचे फॅक्ट क्रिसेंडोच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Title:सत्य पडताळणी : महाराष्ट्रात आहे का छत्रपती शिवाजी महाराज मशीद?
Fact Check By: Amruta KaleResult: True
