
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी 50 हजार कोटी दान केल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. अझीम प्रेमजी यांनी खरोखरच कोरोना विषाणूशी लढण्यासाठी 50 हजार कोटी दान केले आहेत का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी खरंच 50 हजार कोटी दान केले का? याचा शोध घेतला. त्यावेळी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील गतवर्षीचे म्हणजेच 15 मार्च 2019 रोजीचे एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तानुसार अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या कंपनीचे 52,750 कोटी किंमतीचे शेअर्स चॅरिटीला दान केले होते. एकूण संपत्तीच्या 34 टक्के भाग त्यांनी 2019 मध्ये दान केला आहे.

एनडीटीव्हीने दिलेले वृत्त / Archive
विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी 50 हजार कोटी दान केल्याची माहिती समाजमाध्यमामध्ये पसरल्यानंतर सध्या असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण अझीम प्रेमजी यांच्याकडून देण्यात आले आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशनचे शिक्षण क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान आहे. संस्था देशातील अनेक क्षेत्रात कार्यरत असून त्या-त्या राज्य सरकारसोबत भागिदारी केली आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशनचे कार्य देशाच्या उत्तर-पूर्व राज्यांशिवाय कर्नाटक, उत्तराखंड, राजस्थान, छत्तीसगड, पुदुत्चेरी, तेलंगणा आणि मध्य प्रदेशाही विस्तारले आहे, अशी माहिती फाउंडेशनकडून देण्यात आली. जागरण जोश या संकेतस्थळाने याबाबत दिलेले वृत्त आपण खाली पाहू शकता.

जागरण जोशच्या संकेतस्थळावरील वृत्त / Archive
या माहितीतून हे स्पष्ट झाले की, अझीम प्रेमजी यांनी 2019 मध्येच 50 हजार कोटी दान केले आहेत. त्यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आता दान केल्याचे असत्य आहे.
निष्कर्ष
विप्रोचे कंपनीचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी 2019 मध्येच 50 हजार कोटी दान केले आहेत. त्यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आता दान केल्याचे असत्य आहे.

Title:कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अझीम प्रेमजींनी 50 हजार कोटी दान केले का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
