राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका सभेत राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री गेहलोत यांच्या भाषणादरम्यान लोक मोदी-मोदीचे नारे देतात.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की,व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. मूळ व्हिडिओमध्ये सभेत कोणीही नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा देत नव्हते.

काय आहे दावा ?

युजर्स व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “जिथे तिथे मोदी आणि मोदीच.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ क्लिप अशोक गेहलोत 22 नोव्हेंबर रोजी राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील मालपुरा शहरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणची आहे.

गेहलोत यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरुन या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

https://www.youtube.com/live/2VXOmoBXyl8?si=kP1fsAiaq4baSQGo&t=121

संपूर्ण भाषण पाहिल्यावर 2 मिनिट 01 सेकंदावर आपण व्हायरल व्हिडिओ पाहू शकतो. ज्यामध्ये भाषणादरम्यान गोंधळ करणाऱ्या काही लोकांना गेहलोत शांत बसायला सांगतात. परंतु, या ठिकाणी कोणीही मोदींच्या नावाने घोषणा देताना आढळत नाही.

मूळ व्हिडिओमध्ये अशोक गेहलोत म्हणतात की, यंदा जर काँग्रेस विजय ठरलीतर घोषणा पत्रातील सर्व वायदे लागू केले जातील. तसेच त्यांनी मालपुरातील आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मत देण्यास सांगितले.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे.

https://youtu.be/kFgKhlsjXrI

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. मूळ व्हिडिओमध्ये सभेत कोणीही नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा देत नव्हते. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या सभेत लोक मोदी – मोदीचे नारे देत होते का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Altered