राहूल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांनी 2020 मध्ये राम मंदिराच्या पायाभरणीला विरोध केला होता का? वाचा सत्य
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि इतर सदस्य काळ्या कपड्यांमध्ये दिसतात.
दावा केला जात आहे की, राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 5 ऑगस्ट 2020 रोजी सर्व काँग्रेस खासदारांनी राम मंदिर पायाभरणीचा विरोध करण्यासाठी संसद भवनात काळे कपडे घालून गेले होते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो 2020 सालचा नाही. या ठिकाणी राहूल गांधी आणि काँग्रस खासदार महागाई आणि बेरोजगारी यांसारख्या विषयांवर सरकारचा विरोध करत होते.
काय आहे दावा ?
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “5 ऑगस्ट 2020 रोजी श्री रामजन्मभूमीची पायाभरणी झाली तेव्हा काँग्रेसचे खासदार काळे कपडे घालून संसद भवनात गेले.”
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, टेलीग्राफ इंडिया या वृत्ताने हा फोटो 5 ऑगस्ट 2022 रोजी शेअर केला होता.
या फोटोसोबत बातमी दिली होती की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दरवाढीवर देशव्यापी निदर्शने केली होती.
याच वेळी राष्ट्रपती भवनामध्ये राहूल गांधी आणि काँग्रेस खासदारांनी निषेध दर्शवण्यासाठी काळे कपडे घातले होते.
व्हायरल फोटो त्याच निदर्शनादरम्यानचा आहे.
मूळ पोस्ट – टेलीग्राफ इंडिया
इंडिया टीव्हीच्या बातमीनुसार “काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 5 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्लीत महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढीबद्दल पक्षाच्या खासदारांसह राष्ट्रपती भवनात काळे कपडे घालून निषेध केला होता.”
निदर्शनात जे भवनाचे सदस्य नव्हते त्यांना राष्ट्रपती भवनात पोहोचण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल आणि काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
राम मंदिर भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले होते. भूमिपूजन
काँग्रेसचे भूमिपूजनाला समर्थन
सर्व प्रथम प्रियंका गांधी यांनी ‘राम सर्वांचा आहे.’ असे ट्विट करत राम मंदिर भूमिपूजनाला आपले समर्थ दाखले. त्यानंतर मनीष तिवारी, कमलनाथ, दिग्विजय सिंह आदींसह अनेक काँग्रेस नेते राम मंदिर भूमिपूजनाच्या समर्थनार्थ पुढे आले होते.
तसेच राहूल गांधी यांनी भूमिपूजनाच्या दिवशी ट्विट केले की, “राम प्रेम, करुणा आणि न्याय आहेत.” संपुर्ण बातमी आपण येथे वाचू शकतात.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो 2020 सालचा नाही. या ठिकाणी राहूल गांधी आणि काँग्रस खासदार राम मंदिराच्या पायाभरणी विरोधात निषेध करत नव्हते. ते महागाई आणि बेरोजगारी या विषयांवरुन सरकारचा विरोध करत होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:राहूल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांनी 2020 मध्ये राम मंदिराच्या पायाभरणीला विरोध केला होता का? वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: False