
जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्याची संख्या 24 लाखावर पोहचली आहे. यामूळे एक लाख 65 हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूमुळे 211 जणांचा मृत्यू झाला आहे. लंडनमधून सुरतमध्ये परतलेल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या एका पारशी समाजाच्या युवतीचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खरोखरच सुरतमधील कोरोना विषाणूची लागण झालेल्या पारशी समाजाच्या युवतीचा आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
लंडनमधून सुरतमध्ये परतलेल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या एका पारशी समाजाच्या युवतीचा हा व्हिडिओ आहे का? हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओतील एक दृश्य घेऊन ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी Nicole Poppy Keatley यांनी 18 मार्च 2020 रोजी फेसबुकवर पोस्ट केलेला एक व्हिडिओ आम्हाला दिसून आला. या व्हिडिओसोबत देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, व्हिडिओत दिसणारी महिला ही तारा जेन लँगस्टन आहे. त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मागील काही काळापासून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
निकोल पपी किट्टीसोबत फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला तेव्हा त्यांनी याला दुजोरा दिली की ही त्यांची बहीण तारा जेन लँगस्टन असून त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यानंतर द गार्डियन या वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने 20 मार्च 2020 रोजी प्रसिध्द केलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तातही त्याचे नाव तारा जेन लँगस्टन असून त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे.

सुरत महापालिकेने ही महिला सुरतमधील नसल्याचे स्पष्ट केले आहे. यातून हे स्पष्ट झाले की, ही महिला ब्रिटीश असून तिचे नाव तारा जेन लँगस्टन आहे. ती भारतातील अथवा सुरतमधील असल्याचा दावा असत्य आहे.
निष्कर्ष
कोरोना विषाणूची लागण झालेल्या महिलेचा म्हणून पसरत असलेला हा व्हिडिओ तारा जेन लँगस्टन या ब्रिटीश महिलेचा आहे. ही सुरतमधील पारशी समाजातील महिला असल्याचा दावा असत्य आहे.

Title:कोरोना विषाणूची लागण झालेल्या ब्रिटीश महिलेचा व्हिडिओ सुरतमधील महिलेचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
