
लोकसभा 2019 साठी अनेक पक्षाचे नेते प्रचारासाठी विविध ठिकाणी भेट देत असतात. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी मध्यप्रदेशातील इंदोर शहरात प्रचारासाठी गेल्या असताना काही जण रस्त्यावर मोदी मोदी करताना पाहून, स्वतःची गाडी थांबवून त्या लोकांना भेटल्या असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी सत्य पडताळणी केली.
सत्य पडताळणी
पोस्टमध्ये व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका शहराच्या रस्त्यावरुन काळ्या रंगाच्या कार जात असताना, रस्त्याच्या कडेला मोदी मोदी म्हणून काही लोक नारा देत होते. त्यावेळी अचानक त्या एका काळ्या रंगाची कार रस्त्यावर थांबली, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी त्या कारमधून उतरतात आणि मोदी मोदी चा नारा देणाऱ्या लोकांना भेटत, आप आपकी दुनिया मे मै मेरी दुनिया मे… असे म्हणत बेस्ट ऑफ लक देत पुन्हा आपल्या काळ्या रंगाच्या गाडीमध्ये जावून बसतात. यावेळी प्रियांका गांधी सोबत त्यांचे अंगरक्षक देखील त्या व्हिडिओमध्ये दिसून येतात. लोकमत न्यूज 18 या फेसबुक पेजवरुन या व्हिडिओची बातमी व्हायरल झाली आहे.
व्हिडिओच्या संदर्भात गुगलवर आम्ही सर्च केले. त्यानंतर हा व्हिडिओ मध्यप्रदेशातील इंदोर शहरातील लोकसभा 2019 साठीच्या प्रचारासाठी जात असताना मध्येच रस्त्यामध्ये गाडी काही क्षणांसाठी थांबवून काढण्यात आलेला आहे. या व्हिडिओ विषयी प्रसारमाध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध झालेली आहे.
पोस्टमधील व्हिडिओ विषयी युट्युबवर एनडीटीव्ही चॅनलवर आणि एबीपी न्यूज 14 मे 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. खाली आपण हा व्हिडिओ सविस्तर पाहू शकता.
त्याचप्रमाणे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या इंदोर मधील त्या व्हिडिओविषयी Scroll.in या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेल्या बातमीत प्रशांत कुमार यांनी या व्हिडिओविषयी केलेले ट्विट देण्यात आले आहे.
निष्कर्ष : संपूर्ण संशोधना नंतर असे आढळून आले की, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी लोकसभा 2019 साठी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात गेल्या असताना, प्रचार सभेसाठी जात असताना मध्येच रस्त्यात स्वतःची गाडी थांबवत मोदी मोदी चा नारा देणाऱ्या लोकांना भेट देत त्यांना “आप आपकी जगह, मै मेरी जगह” असे म्हणत शुभेच्छा देत होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ सत्य आहे.

Title:‘मोदी मोदी’ घोषणा देणाऱ्यांना पाहून प्रियांका गांधी यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली का?
Fact Check By: Amruta KaleResult: True
