FACT CHECK : एआय व्हिडिओ इराणचा इस्रायलवरील हल्ल्याचे खरे दृष्य म्हणून व्हायरल

False राजकीय | Political

इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. याचदरम्यान एक कथित हवाई हल्ल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

दावा केला जात आहे की, यात इराणने एकाच वेळी अमेरिका आणि इस्रायलवर हवाई हल्ला केल्याचे  दाखवले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एआयद्वारे (AI) तयार केलेला आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये काही लढाऊ विमान आणि हवाई हल्ल्याचे दृष्य दिसतात.

व्हिडिओमध्ये हिंदीमध्ये “इराणने एकाच वेळी अमेरिका आणि इस्रायलवर हल्ला केला” असा मजकूरही दिसतो.

मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

तपासादरम्यान सर्वप्रथम व्हिडिओ नीट पाहिल्यावर त्यावर “सरप्रायझिंग क्लिप्स टीव्ही” असे नाव लिहिलेले दिसते.

हा धागा पकडत सर्च केल्यावर “सरप्रायझिंग क्लिप्स टीव्ही” नामक फेसबुक पेजवर हा व्हिडिओ 28 फेब्रुवारी रोजी शेअर करण्यात आल्याचे आढळले.

https://www.facebook.com/reel/1754363432616258

या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, “हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून तो केवळ मनोरंजनासाठी आहे.”

निष्कर्ष

यावरून स्पष्ट झाले की, व्हायरल होणारा हवाई हल्ल्याचा व्हिडिओ खोटा आहे. हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून, त्याचा इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील कोणत्याही खऱ्या हल्ल्याशी संबंध नाही. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्याव्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोलाफेसबुक,इन्स्टाग्रामट्विटरयेथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: FACT CHECK : एआय व्हिडिओ इराणचा इस्रायलवरील हल्ल्याचे खरे दृष्य म्हणून व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *