तथ्याची पडताळणी: काय खरंच कर्करोगावरील इलाज सापडला, 48 तासात संपेल कोणत्याही स्टेजचा कर्करोग?

खोटी न्यूज I Fake News वैद्यकीय

अमेरिकेत एक असं संशोधन झालं आहे की ज्यामुळं कोणत्याही स्टेजच्या कर्करोगावर इलाज शक्य होणार आहे. कर्करोगावरील महागडा इलाज ही सामान्यांसाठी आवाक्याबाहेरची बाब आहे. केमोथेरपीनेही अनेकांचा मृत्यू होतो. कॅ‌‍लिफोर्निया विद्यापीठाने याबाबत संशोधन करुन एक बाब समोर आणली आहे. द्राक्षांच्या बियाणांचे सेवन केल्याने कर्करोगावर इलाज होऊ शकतो. डॉ. हर्डिन बी. जॉन्स यांनी याबाबतचं संशोधन केलंय. या रसाचा प्रभाव इतका चांगला आहे की 48 तासातच तुम्हाला त्याचा परिणाम दिसु लागेल.

ही बातमी फेसबुकवरही मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंग होत आहे. अवघ्या सहा तासात 7 हजारहून अधिक लोकांनी ही बातमी पाहिली आहे. अनेकांनी या बातमीवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अशा प्रकारे सत्याचा विपर्यास करुन बातमी चालवू नये, असे प्रेक्षकांनी आणि वाचकांनी म्हटलंय.

या बातमीला 252 जणांनी आपली पसंती दर्शवली आहे. तर 239 जणांनी ही बातमी शेअर केली आहे. अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

याच बातमीला आपण खाली दिलेल्या लिंकवर सविस्तर वाचू शकता.

News18 l Webdunia l HindiGuardian l Livebavaal

यापूर्वीही काही वर्षापासून अशा बातम्या चालविण्यात येत आहेत. या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

Bhaskar l Dailyhunt

तथ्य पडताळणी

कॅलिफोर्निया विघापीठाच्या संकेतस्थळावर आम्ही याबाबत तथ्य तपासण्याचा प्रयत्न केला. आम्हाला या वृत्ताला दुजोरा देणारी कोणतीही बाब दिसली नाही. डॉ. हर्डिन बी. जॉन्स यांनी कर्करोगावर संशोधन केलं असलं तरी त्यांनी 1978 पर्यंतच या विद्यापीठात संशोधन केल्याचंही समोर आले. खालील लिंकमध्ये डॉ. जॉन्स यांच्याबद्दलची अधिक माहिती देण्यात आली आहे.

OAC.CDIB.ORGभोपाळच्या एका खासगी रुग्णालयातील तज्ञ डॉ. नाजिम अली यांनी सांगितले की, ही गोष्ट सत्य आहे की यात ब-याच प्रमाणात कॅलरीज, फायबर आणि क आणि ड जीवनसत्व आहे. ग्लुकोज, मॅग्नेशियम, सायट्रिक अॅसिडसारखे तत्व आहेत. याचे सेवन केल्याने कर्करोग, मुत्रपिंड आणि कावीळसारख्या आजारापासून तुम्ही स्वत:चा बचाव करु शकता. द्राक्षाच्या रसात आढळणारं  जेएनके हे प्रोटीन कॅन्सरच्या कोशिका 76 टक्के समाप्त करतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार याच्या नियमित सेवनाने 48 तासात याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतात.

स्त्रोत : न्यूज 18

निष्कर्ष:
द्राक्षांचे बी खाल्ल्यानं कर्करोग 48 तासात बरा होतो, हा दावा सपशेल खोटा आहे. द्राक्षाचे बी खाल्ल्याने कर्करोगावर त्याचा प्रभाव पडतो एवढंच सत्य आहे. त्यामुळे असा दावा करणा-या बातम्या खोट्या आहेत. संदिग्ध माहितीच्या आधारे त्या प्रसारित केल्या जात आहेत.

False Title: तथ्याची पडताळणी: काय खरंच कर्करोगावरील इलाज सापडला, 48 तासात संपेल कोणत्याही स्टेजचा कर्करोग?”
Fact Check By: Dattatray Gholap 
Result: Fake