
संसदेत 74 महिला खासदार आहेत, यातील एकही महिला खासदार उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेच्या बाजुने उभी राहिली नाही, ही अतिशय लज्जास्पद बाब आहे, अशी माहिती Suraj Waghambare यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
फेसबुक / Archive
तथ्य पडताळणी
उन्नाव बलात्कार प्रकरणात महिला खासदारांनी आवाज उठवला नाही का? याचा आम्ही शोध घेतला तेव्हा आम्हाला एनडीटीव्हीचा खालील व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत खासदार मोहुआ मोईत्रा यांनी उन्नाव प्रकरणावर वक्तव्य करताना दिसून येत आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रश्नावर संसदेत आवाज उठवला असल्याचे हिंदूस्थान समाचारने आपल्या वृत्तात म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी संसदेत काय म्हटलंय, हे हिंदूस्तान समाचारने या व्हिडिओ दाखवले आहे. या व्हिडिओत 4 मिनिटे 14 सेकंद ते 4 सेकंद 36 सेकंद या कालावधीत त्या काय म्हणाल्या हे आपण पाहू शकता. या वेळेस 78 लोकसभा खासदार निवडून आल्या असल्याचेही या व्हिडिओत म्हटले आहे.
उन्नाव प्रकरणात विरोधी पक्षांनी संसदेबाहेर निदर्शने केली. यात खासदार जया बच्चन या देखील सामील झाल्या होत्या. द न्यू इंडियन एक्सप्रेसचा याबाबतचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.
निष्कर्ष
उन्नाव प्रकरणात अतिशय कमी महिला खासदारांनी आवाज उठवला आहे. उन्नाव प्रकरणातील पीडितेच्या बाजूने एकही महिला खासदार उभी राहिली नाही, असे मात्र म्हणता येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : उन्नाव बलात्कार प्रकरणात महिला खासदारांनी आवाज उठवला नाही का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
