नागपूरचे जिल्हाधिकारी विजय मानकर यांनी गीता कचऱ्यात फेकली पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. त्यांना निलंबित करून तुरूंगात टाकण्यात यावे, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उल्हास तावडे, कमलप्रसाद तिवारी आदींनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरोखरच नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी असे कोणते वक्तव्य केले का, याचा आम्ही सर्वप्रथम शोध घेतला. त्यावेळी असे कोणतेही वक्तव्य दिसून आले नाही. विजय मानकर यांनी असे वक्तव्य केले आहे का, ते नागपूरचे जिल्हाधिकारी आहेत का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही नागपूर जिल्ह्याच्या संकेतस्थळास सर्वप्रथम भेट दिली. त्याठिकाणी आम्हाला नागपुरचे जिल्हाधिकारी हे सध्या रवींद्र ठाकरे असल्याचे दिसून आले. 

nagpur.gov.in.png

नागपूर जिल्ह्याचे संकेतस्थळ / Archive

यातून विजय मानकर हे नागपूरचे जिल्हाधिकारी नसल्याचे स्पष्ट झाले. विजय मानकर हे नेमके कोण आहेत, याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी हिंदी वन इंडिया या संकेतस्थळावरील 26 मे 2017 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार मानकर हे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाचे नेते आहेत. 

screenshot-hindi.oneindia.com-2020.02.03-20_43_41.png

हिंदी वन इंडिया संकेतस्थळावरील वृत्त / Archive

जनसत्तानेही (संग्रहण) याबाबतचे वृत्त दिले असल्याचे दिसून आले. विजय मानकर यांचे वैयक्तिक संकेतस्थळही (संग्रहण) आम्हाला हेच दिसून आले. यातही त्यांनी स्वत:चा उल्लेख आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे नेते असा केलेला दिसून येतो. यातून हे स्पष्ट होते की, विजय मानकर हे जिल्हाधिकारी नाहीत. तर राजकीय पक्षाचे नेते आहेत.

निष्कर्ष

नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गीतेवर कोणतेही भाष्य केलेले नाही. विजय मानकर हे नागपूरचे जिल्हाधिकारी नाहीत. आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाचे नेते आहेत. 

Avatar

Title:नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गीता कचऱ्यात फेकली पाहिजे असे वक्तव्य केलंय का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False