
पुण्यात तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन राहणार आहे. फक्त दुधाची दूकाने, मेडीकल आणि रूग्णालय सूरू राहणार आहेत. भाजीपाला, किराणा दूकाने बंद राहणार आहेत. पोलिसांनी नागरिकांना याबाबत आवाहन केले असून कडक कारवाईचा इशारा दिला आहे, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पुणे पोलिसांचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
पुण्यात 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे की, याची माहिती घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम पुणे पोलिसांच्या फेसबुक पेजला भेट दिली.
याठिकाणी पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी ही क्लिप पुण्याशी संबंधित नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलीस दलाला सहकार्य करा आणि घरात राहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हा व्हिडिओ पुणे शहरातील नसला तरी कुठला आहे हे मात्र स्पष्ट होत नव्हते. या व्हिडिओत दिसणारा पुतळा हा शाहू महाराजाचा असल्याचे स्पष्ट दिसत होते. आम्ही या दोन्ही शोध घेतला असता तो इचलकरंजी येथील शाहू महाराजाचा पुतळा असल्याचे स्पष्ट झाले. यावरुन व्हिडिओ त्या भागातील असल्याचेही स्पष्ट होत आहे.
इचलकरंजी पोलिसांनी फॅक्ट क्रेसेंडोशी बोलताना दुजोरा दिला की, नगरपालिकेने असे आवाहन केले होते.
निष्कर्ष
पुण्यात तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा पुणे पोलिसांचा नाही.

Title:लॉकडाऊनचा हा व्हायरल व्हिडिओ पुणे पोलिसांचा नाही; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
