इराकमधील व्हिडिओ गुजरातमधून अरब देशाला गाई पाठविल्याच्या खोट्या दाव्यासह व्हायरल

False राजकीय | Political

एका कथित बंदरावर गायींनी भरलेल्या ट्रकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, अदानी समुहाकडून गुजरात बंदरावरून अरब देशाला हजारो गायी पुरवितानाचा हा व्हिडिओ आहे

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा असून भारताशी संबंधित नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एका बंदरावर गायींनी भरलेले ट्रक दिसतात. युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “गुजरात : अदानीच्या बंदरात हजारो गायी ट्रकमध्ये उभ्या आहेत. अरब देशांमध्ये जाण्यासाठी.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ गुजरात किंवा भारतातील नाही.

मांस बाजार (मराठी अनुवाद) नामक एका फेसबुक पेज वर हाच व्हिडिओ आढळला. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “ईद अल-अधाची तयारी.”

इस्लाममध्ये ईद-उल-अधा हे त्यागाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी विशेषतः बकऱ्यांचा बळी दिला जातो, म्हणूनच या दिवशी बकर ईद असेही म्हणतात.

https://www.facebook.com/reel/1272554104131048

आर्काइव्ह

अधिक तपास केल्यावर व्हायरल व्हिडिओसारख्या डिझाइन असलेले बंदर आढळले.

खालील व्हिडिओमध्ये आपण व्हायरल व्हिडिओ प्रमाणे आसपासचा परिसर, ट्रक्स आणि गोदाम पाहू शकता. हा व्हिडिओ इराकच्या उम्म कसर बंदराचा आहे.

खालील तुलनात्मक फोटोमध्ये आपण व्हायरल व्हिडिओ आणि इराकमधील बंदरामधील साम्य पाहू शकता.

याशिवाय, व्हायरल व्हिडिओ बारकाईने पाहिल्यावर गाय वाहून नेणाऱ्या ट्रकवर मर्सिडीज कंपनीचा लोगो असल्याचे दिसते. तसेच इराकच्या उम्म कसर बंदराच्या व्हिडिओमध्ये देखील मर्सिडीज कंपनीचे ट्रक दिसतात. परंतु, भारतात “मर्सिडीज” ब्रँडचे ट्रक वाहतुकीसाठी वापरले जात नाहीत.

या दोन्ही व्हिडिओमधील वाहनाचा तुलनात्मक फोटोपाहिल्यावर आपल्याला वाहनांमधील साम्य आढळेल.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ गुजरात किंवा भारताशी संबंधित नसून हे इराकमधील बंदर आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:इराकमधील व्हिडिओ गुजरातमधून अरब देशाला गाई पाठविल्याच्या खोट्या दाव्यासह व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False


Leave a Reply