
EVM घोटाळ्यात सुप्रीम कोर्टही ; उदीत राज अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दैनिक पुढारीने दिनांक 22 मे 2019 रोजी हे वृत्त प्रसिध्द केले होते. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
EVM च्या मुद्दयावर उदित राज यांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे, ते काय म्हणाले याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी आम्हाला उदित राज यांचे खालील ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये काय म्हटलंय याचा स्वैर अनुवाद खालील प्रमाणे आहे. ‘सुप्रीम कोर्टाला असे का वाटत नाही VVPAT सर्व पावत्यांची गणना व्हावी, काय तेही या घोटाळ्यात सामील आहेत का? निवडणूक प्रक्रियेत मागील तीन महिन्यापासून सर्व कामे मंदगतीने सुरू आहे मग त्यात आणखी दोन-तीन दिवस लागल्याने काय फरक पडतोय?’’
या ट्विटच्या आधारावर हे स्पष्ट होत आहे की, उदित राज यांनी EVM घोटाळ्यात सुप्रीम कोर्टही, असे कुठेही म्हटलेले नाही. सुप्रीम कोर्ट EVM घोटाळ्यात सहभागी आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर द इकोनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तनिवेदिकेच्या प्रश्नावर उदित राज यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहिली. या प्रतिक्रियेत त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, या ट्विटद्वारे आपण सुप्रीम कोर्टाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही प्रतिक्रिया आपण खाली दिलेल्या लिंकमध्ये पाहू शकता.
त्यानंतर टाईम्स नाऊ मराठीने याबाबत दिलेले वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तानुसार सुप्रीम कोर्ट या घोटाळ्यात सामील आहे का? असा प्रश्न उदित राज यांनी उपस्थित केला आहे.
मराठी हिंदूस्थान टाईम्सने याबाबत दिलेल्या वृत्तात उदित राज यांनी सर्वोच्च न्यायालयाबाबत वादग्रस्त टि्वट केल्याचे म्हटले आहे. सर्व व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या जाव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाला का वाटत नाही. का तेही या घोटाळ्यात सहभागी आहेत, असे उदित राज म्हणाल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
दैनिक पुढारीचे सविस्तर वृत्त काळजीपूर्वक वाचल्यास त्यातही EVMच्या घोटळ्यात सर्वोच्च न्यायालायही सहभागी आहेत का? असा प्रश्न उदित राज यांनी उपस्थित केल्याचे दिसून येते.
शीर्षक देताना मात्र EVM घोटाळ्यात सुप्रीम कोर्ट : उदीत राज असे म्हटले आहे. असे वक्तव्य उदित राज यांनी केलेले नाही.
निष्कर्ष
‘EVM घोटाळ्यात सुप्रीम कोर्टही’ असे उदित राज यांनी कुठेही म्हटलेले नाही. विविध माध्यमांच्या वृत्तातुन आणि उदित राज यांच्या ट्विटवरुनही हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत या वृत्ताचे शीर्षक चुकीचे असल्याचे आढळून येते.

Title:Fact Check : उदीत राज म्हणाले का, EVM घोटाळ्यात सुप्रीम कोर्टही?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
