
सायकलवाल्यांनाही आता दंड आकारणी करण्यात येत आहे, अशी माहिती Ds Moon यांनी पोस्ट केली आहे. या माहितीसोबत एक व्हिडिओही देण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
गुजरातमध्ये सायकलवाल्यांना दंड आकारणी करण्यात आली का? याची माहिती घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स सर्च केली. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला.
या परिणामात आम्हाला एनडीटीव्ही इंडियाने 19 सप्टेंबर 2019 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात ही घटना तामिळनाडूतील पन्नगाराम येथील अर्यूर येथे घडल्याचे म्हटले आहे. द हिंदूला पोलीस उपनिरीक्षक एस. सुब्रामणी यांनी सांगितले की, सायकल जप्त करण्यात आल्याची माहिती पुर्णपणे चुकीची आहे. दोन्ही हात सोडून सायकल चालवत असल्याने या व्यक्तीला पकडण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ एका इमारतीच्या छतावरुन चित्रित करण्यात आला आहे. थोडीशी चर्चा केल्यानंतर या युवकाला रस्त्याच्या कडेला नेण्यात आले. या व्हिडिओ काही वाहनचालक विना हेल्मेट जाताना दिसत आहेत. याबाबत ते म्हणाले की, एका व्यक्तीला पकडले असताना दुसऱ्या वाहनचालकावर कारवाई करता येणे शक्य नव्हते. या हात सोडून सायकल चालवणाऱ्या व्यक्तीच्या पुढे दोन दुचाकीस्वार होते. त्यांनी अचानक ब्रेक दाबला असता तर हा सायकलस्वार त्यांना धडकून अपघाताची भिती असल्याने त्याला पकडले होते.
एनडीटीव्ही इंडियाने याबाबत दिलेले वृत्त आपण खाली पाहू शकता.
दैनिक लोकमत, पत्रिका आणि चौथी दुनिया या संकेतस्थळांनीही याबाबतचे वृत्त दिले आहे. द
lokmatnews.in | patrika.com | chauthiduniya.com |
Archive | Archive | Archive |
युटूयूबवर The Newsbol ने याबाबत बनविलेला एक व्हिडिओ आम्हाला दिसून आला. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.
या माहितीच्या आधारे हे स्पष्ट झाले की या युवकाकडून वाहतूक पोलिसांनी कोणताही दंड घेतलेला नसून त्याला केवळ समज दिली.
निष्कर्ष
तामिळनाडू पोलिसांनी या सायकलस्वाराकडून कोणताही दंड न आकारता त्याला समज देत सोडून दिले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact : पोलिसांबाबत या व्हिडिओचा वापर करत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
