सोशल मीडियावर एका व्हायरल फोटोद्वारे दावा केला जात आहे की, राजस्थानमध्ये एका मुस्लिम युवकाने आपल्या हिंदू प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह दुचाकीवर ठेवून घेऊन गेला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोसोबत केलेला दावा खोटा आहे. हा फोटो भारतातील नसून इजिप्त आहे आणि तो मृतदेह नसून कपड्याच्या दुकानातील पुतळा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये बाईकवर बांधलेल्या पोत्यातून पाय बाहेर आलेला आहे. हा फोटो शेअर करून युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “राजस्थानमधील ही हिंदू मुलगी बिनिता आहे. ती तिच्या पालकांना सोडून गेली आणि 22 दिवसांनी हा मुस्लिम मुलगा मोहम्मद तिला एका गोणीत घेऊन जात होता. तिला पुलाखाली टाकण्यासाठी पोत्यातून नेत असताना पोत्यातून पाय केव्हा बाहेर आला ते त्याला कळलेही नाही. हे त्या गाडी मालकाचे उपकार आहेत की मोहमद चा व्हिडीओ बनवून पोलीसांना सुचित केले पोलिसांनी मोहमद ला ताबडतोब रंगेहाथ पकडले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम राजस्थानमध्ये अशी कोणती घटना घडली का याची माहिती शोधली. परंतु, अशा प्रकारची एकही बातमी आढळली नाही. उलट राजस्थान पोलिसांनी हा फोटो राजस्थानमधील नसल्याचा ट्विटरवर खुलासा केला आहे.

“सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो फेक न्यूज आहे. दुचाकीवरून मृतदेह घेऊन जात असल्याचा दावा खोटा असून हा फोटो इजिप्तमधील आहे. तसेच गाडीवर मृतदेह नसून पुतळा आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे ट्विटमध्ये म्हटलेले आहे.

https://twitter.com/PoliceRajasthan/status/1665549620733157376

हा धागा पकडून या फोटोचा शोध घेतला. रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कैरो-24 या वेबसाईटवर हा फोटो आढळला. सोबत दिलेल्या महितीनुसार हा फोटो इजिप्टमधील सलाह सलेम गावातील आहे. तसेच गाडीवर कपड्याच्या दुकानात प्रदर्शनी भागात ठेवला जाणारा पुतळा आहे.

हा फोटो इजिप्तमध्ये मृतदेह तस्करीच्या नावाने व्हायरल झाला होता. अल झुब्दा वेबसाईटनुसार फोटोमधील व्यक्ती मोहम्मद नसर (28) कपड्याच्या दुकानाचा मालक आहे.

त्याने सांगितले की, “या फोटोमध्ये मी मृतदेह घेऊन जात नव्हतो. मी पुतळा घेऊन जात होतो. पोत्यातून पुतळ्याचे पाय बाहेर राहिल्याने लोकांचा गैरसमज झाला होता. ज्याचा त्रास मलादेखील झाला. पोलिसांनी संपूर्ण तपास केला असून फोटोत मृतदेहऐवजी पुतळा असल्याचे स्पष्ट झाले आहे.”

मोहम्मद नसर यांनी आपल्या बीजी कलेक्शन या फेसबुक पेजवर मृतदेहाच्या अफवेचे खंडन केल होते. या पोस्टमध्ये लिहिले की, ‘‘आमच्या दुकानाच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पुतळा घेऊन जातानाचा हा फोटो आहे.”

https://www.facebook.com/BGCollectionWear/posts/pfbid0CbTrvPDB1MGUcKuqpi4QobZjnVTsHhbcJQ97KfTjr6JsvTyNDj3ozNj2L9TquSV8l?__cft__[0]=AZUOXYXWLx0DdBQvTlsgXz-0aOV32mbrG2KKOxsnAote4oPtoNch4GVlsi3ByIVGc9Y74e8APXsbBWKF_3XIPOkqGabKA8y5abTO4DpncTsjxzA5VM3EiFbPBugOE9YxVxPs1urmtH9ci6yPu33LS_boWndX6YB7BLGrnEBMp2EiAnOCVML8pFwHS9HUp0VMRXM&__tn__=%2CO%2CP-R

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोसोबत केलेला दावा खोटा आहे. हा फोटो राजस्थानचा नसून इजिप्तचा आहे. या फोटोमध्ये दुचाकीस्वार कपड्याच्या दुकानातील पुतळा घेऊन जात होता. चुकीच्या सांप्रदायिक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:दुचाकीस्वार मृतदेह नाही तर पुतळा घेऊन जात आहे; इजिप्तमधील फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False