Fact Check : तरबेजच्या वडिलांचीही मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाली होती का?

Mixture राजकीय | Political

झारखंडमध्ये मॉब लिंचिंगचा बळी ठरलेला तरबेज अन्सारी यांचाही मॉब लिचिंगमध्ये मृत्यू झाला होता, अशी माहिती असलेले एका वृत्तपत्राचे कात्रण Satish Vengurlekar यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने तरबेजच्या वडिलांचे खरंच मॉब लिचिंग झाले होते का? याची तथ्य पडताळणी केली होती. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

झारखंडमध्ये मॉब लिंचिंगचा बळी ठरलेला तरबेज अन्सारी यांचाही मॉब लिचिंगमध्ये मृत्यू झाला होता, असे भाजप आमदार लक्ष्मण टुडू यांनी म्हटल्याचे या वृत्तात म्हटले आहे. त्यांनी आम्ही हे वृत्तपत्राचे कात्रण रिव्हर्स सर्च करुन ते शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला असे कोणतेच वृत्त दिसून आले नाही. त्यानंतर घाटशिला येथील भाजप आमदार लक्ष्मण टुडू यांनी असे काय वक्तव्य केले का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला त्यांनी अशा स्वरुपाचे वक्तव्य केल्याचे वृत्त दिसून आले. 

न्यूज 18 मूळ वृत्त / Archive

भाजप आमदार लक्ष्मण टुडू यांनी हा आरोप केल्यानंतर तरबेज अन्सारी यांचे चुलते मरसूद आलम यांनी 27 जून 2019 रोजी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी तरबेज अन्सारी याच्या वडिलांचा मॉब लिचिंगमध्ये मृत्यू झाल्याची बाव त्यांनी नाकारली आहे. तरबेजच्या वडिलांच्या मित्रांनीच तरबेजच्या वडिलांची हत्या केली होती. 

आज तकचे मूळ वृत्त 

एमपीसी न्यूज या संकेतस्थळाने तरबेजचे चुलते मरसूद आलम यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. यात त्यांनी तरबेज वेल्डर होता आणि मागील 7 ते 8 वर्षापासून पुणे येथे वास्तव्याला होता असे सांगितले. तरबेजच्या वडिलांचा 2007 मध्ये मृत्यू झाला. त्यांचा खून झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. 

एमपीसी न्यूजचे मूळ वृत्त / Archive

झारखंड पोलिसांच्या संकेतस्थळावरही आम्ही याबाबत काही माहिती मिळते का हे शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला अपेक्षित तरबेजवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती येथे आढळली नाही. 

झारखंड पोलिसांचे संकेतस्थळ 

निष्कर्ष

भाजप आमदार लक्ष्मण टुडू यांनी तरबेज अन्सारीच्या वडिलांचा मृत्यू मॉब लिंचिंगमध्ये झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या वृत्तपत्राचे कात्रण सत्य आहे मात्र त्यानंतर तरबेजच्या चुलत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा समावेश या पोस्टमध्ये कुठेही नाही. त्यामुळे यात नव्या माहितीची भर न टाकता ही पोस्ट का पसरविण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : तरबेजच्या वडिलांचीही मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाली होती का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Mixture