शरद पवार यांनी खरंच कर्जमाफी होणार नसल्याचे म्हटले का? विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

महाराष्ट्रामध्ये अखेर सत्तासंपादनाच्या नाट्यावर पडदा पडला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडीचे सरकार आले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सरकारने अद्याप कामही सुरू केले नाही की, शरद पवार यांनी शेतकरी कर्जमाफी देण्यावरून घुमजाव केल्याची एक कथित क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ते शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी का देता […]

Continue Reading

अहमदनगरच्या शिवसेना शहरप्रमुखाने उद्धव ठाकरेंवर टीका करणारे पत्र लिहिले का? जाणून घ्या त्या व्हायरल मेसेजचे सत्य

विधानसभेच्या निकालानंतर चारही प्रमुख पक्षांना राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही. भाजप-शिवसेना युतीचे बिनसल्यानंतर सत्तास्थापनेअभावी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. दरम्यान, बहुमताची आकडेमोड जुळवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला. त्यानंतर ‘महाशिवआघाडी’चे सरकार येणार का अशी अटकळ बांधण्यात येऊ लागली. सेनेच्या या भूमिकेचा विरोध करणारे एक पत्र सोशल मीडियावर सध्या प्रचंड गाजत आहे. दावा केले जात […]

Continue Reading

FACT CHECK: ‘सिंगल’ तरुणांना गर्लफ्रेंड मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या उमेदवाराचे सत्य काय?

विधानसभा निवडणुकीला केवळ चार दिवस शिल्लक राहिलेले असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोण काय करील याचा काही नेम नाही. मोठी मोठी स्वप्ने दाखवणाऱ्या पक्षांबरोबरच उमेदवारसुद्धा स्थानिक पातळीवर विविध आश्वासने देत असतात. यंदाच्या निवडणुकीत चक्क महिला उमेदवारानेच ‘गाव तेथे बिअर बार’ अशी घोषणा देत बेरोजगारांना दारू विक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आश्वासन दिले. हे काय कमी होते म्हणून […]

Continue Reading

देश सोडून लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलेले नाही. वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला असताना सगळ्या पक्षांचे दिग्गज नेते राज्यात विविध ठिकाणी सभा घेत आहेत. अशाच एका सभेत राहुल गांधी यांनी देश सोडून लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचे म्हटले, असे दाखवणारी व्हिडियो क्लिप सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियो क्लिपची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? 17 सेकंदाच्या या क्लिपमध्ये राहुल गांधी […]

Continue Reading

‘त्या’ जुन्या वादग्रस्त व्हिडियोतील माजी आमदाराला भाजपने उमेदवारी दिली का? वाचा सत्य

एका माजी आमदाराने पोलिसांना अत्यंत अर्वाच्य भाषेतून शिवी दिल्याचा व्हिडियो समोर आला आहे. दावा केला जात आहे की, या आमदाराला भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली आहे. परभणी जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सुमारे 25 वर्षे आमदार राहिलेल्या रामप्रसाद बोर्डीकर यांनी भरसभेत पोलिसांना शिवी दिल्याचा व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडियोवरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. […]

Continue Reading

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘भाजपला मतदान करू नये’ असे आवाहन केले का? वाचा सत्य

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने अनेक विद्यमान मंत्री आणि आमदारांना तिकीट नाकारून सर्वांनाच धक्का दिला. भाजपच्या या धक्कातंत्राची पहिली झलक एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्या रुपाने पाहायला मिळाली. आता यामध्ये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश झाला आहे. कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे यांना तिकीट न देता त्यांच्याजागी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  उमेदवारी […]

Continue Reading