संजय राऊत औरंगजेबच्या कबरीला शौर्याचे प्रतीक म्हणाले का ? वाचा सत्य

सध्या औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्रात वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, संजय यांनी औरंगजेबच्या कबरीला शौर्याचे प्रतीक म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

संजय राऊत यांचा भाजपवर टीका करतानाचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंविरुद्ध वक्तव्य म्हणून व्हायरल

उद्धव बाळासाहेब गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याच पक्ष प्रमुखाविरोधात वक्तव्य करत त्यांच्या कारभारची पोलखोल केली, असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात संजय राऊत भाजप सरकारवर टीका करत होते. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये संजय राऊत म्हणतात की, “निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या मर्यादा ओलांडणे […]

Continue Reading

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी केली नाही; वाचा सत्य

केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या नावाने एक ग्राफिक व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

पुढारीचे स्क्रिनशॉट वापरुन संजय राऊत यांच्या संदर्भात फेक न्यूज व्हायरल; वाचा सत्य

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर सर्व पक्ष नेत्यांनी प्रचाराचे नारळ फोडले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढारी न्यूज चॅनलचे एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या स्क्रिनशॉट सोबत दावा केला जात आहे की, संजय राऊत यांनी घोषणा केली की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर लाडकी बहिण योजनेद्वारे हिंदू महिलांना दुप्पट तर मुस्लिम महिलांना चौप्पट पैसे देण्यात […]

Continue Reading

संजय राऊत यांनी दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन दिले नाही; वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उबाठा गटाचे नेते संजय राऊत म्हणतात की, “आपले सरकार एक दिवस दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल.” दावा केला जात आहे की, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे गटाचे सरकार आल्यावर दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन दिले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुस्लिम हृदयसम्राट म्हटले नाही; बनावट ग्राफिक व्हायरल

आपल्या रोखठोक वक्यव्याने नेहमी चर्चेत राहणारे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुस्लिम हृदयसम्राट म्हटले, या दाव्यासह लोकमतचे लोगो असलेले ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले ग्राफिक कार्ड बानावट आहे. काय आहे दावा […]

Continue Reading

संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करतानाचा व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा; वाचा सत्य

लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका क्लिपमध्ये प्रियांका चतुर्वेदी म्हणतात की, “मोदी ब्रँड महाराष्ट्रात चालणार नाही.”  तर प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या क्लिपमध्ये संजय राऊत म्हणतात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना 25 वर्षे कोणीही टक्कर देऊ शकत नाही.” या व्हिडिओतून दावा केला जात आहे की, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नेत्यांमध्ये मतभेद आहे. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे, असे संजय राऊत म्हटले का ? वाचा सत्य

एबीपी माझा या वेबसाईटचे ग्राफिककार्ड वापरून दावा केला जात आहे की, खासदार संजय राऊत यांनी आपल्याच पक्ष प्रमुखाचा घरचा आहेर देत “उद्धव ठाकरे हे काहीही बोलतील त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे.” असे म्हटले. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक बनावट असून खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंविरोधात असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. काय […]

Continue Reading

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून “उठसूठ मी हिंदू का बोंबलता” असे म्हटले नव्हते; वाचा सत्य

आपल्या परखड आणि वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत राहणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्याविषयी एक दावा व्हायरल होत आहे. टीव्ही-9 मराठी वाहिनीचे ग्राफिक्स वापरून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, राऊत यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून थेट उद्धव ठाकरेंनाच सवाल केला.  व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारले की “उठसूठ मी हिंदू, मी हिंदू, बोंबलत का […]

Continue Reading

महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’मधील गर्दीच्या नावाने ‘मराठा मोर्चा’चा जुना व्हिडिओ व्हायरल

महाविकास आघाडीच्या वतीने 17 डिसेंबर रोजी ‘हल्ला बोल’ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.  या मोर्चाला कितपत प्रतिसाद मिळाला यावरून सोशल मीडियावर वाद सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाची ‘नॅनो’ मोर्चा अशी हेटाळणी केली.  फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर […]

Continue Reading

Fake News: शिवसैनकाने काढला पार्श्वभागावर संजय राऊत यांचा टॅटू? फेक फोटो व्हायरल

एका शिवसैनिकाने पार्श्वभागावर संजय राऊत यांचा टॅटू गोंदविला, असा फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे या शिवसैनिकाचे टॅटू पाहताना दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो खोडसाळपणे एडिट केलेला आहे.  काय आहे दावा? मूळ पोस्ट […]

Continue Reading

वेळ पडली तर शिवसेना राष्ट्रवादीच्या निशाणीवर निवडणूक लढवणार, असे संजय राऊत म्हणाले नाही

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळा गट तयार केल्याने शिवसेना नेमकी कोणाची यावरून संग्राम सुरू आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक निशाणी वापरण्यावरून उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गट या दोघांमध्ये चढाओढ सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, “वेळ पडली तर शिवसेना पुढील निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशाणीवर लढवणार”, असे संजय राऊत म्हणाले. ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राचा […]

Continue Reading

‘संजय राऊत’ यांचा डान्स करतानाचा तो फेक व्हिडिओ पुन्हा व्हायरल

कंगना रणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचा वाद विकोपाला जात असताना सोशल मीडियावर निरनिराळे दावे केले जात आहे. त्यातच आता संजय राऊत यांचा डान्स करतानाचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.   फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ संजय राऊत यांचा नसल्याचे समोर आले. या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती परभणीमधील एक पोलिस कर्मचारी आहे. काय आहे दावा? […]

Continue Reading

कंगना रणौतच्या समर्थनात करणी सेनेचा 1000 वाहनांचा ताफा रवाना झाला का? वाचा सत्य

अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे वाकयुद्ध तापलेले आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, कंगनाला समर्थन देण्यासाठी करणी सेनेचा 1000 वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा (FALSE) आढळला. काय आहे दावा? सोशल मीडियावरील पोस्टमध्ये वाहनांच्या लांबच्या लांब ताफ्याचे फोटो शेयर करून कॅप्शन दिली आहे […]

Continue Reading

महाराष्ट्रातील या प्रमुख नेत्यांनी एकत्रित ‘तान्हाजी’ चित्रपट पाहिला का? काय आहे सत्य या फोटोचे?

तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवत आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल फोटोद्वारे दावा केला जात आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकत्र हा चित्रपट पाहिला. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची […]

Continue Reading