अक्षय कुमारच्या हातात ABVP चा झेंडा? वाचा काय आहे सत्य

सोशल मीडियावर अभिनेता अक्षय कुमारचा हातात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (एबीव्हीपी) झेंडा धरल्याचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, अक्षय कुमारने जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेचे समर्थन करीत एबीव्हीपीला पाठिंबा दिला होता. नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) वाढीव फी विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान विद्यापीठाच्या वसतिगृहावर हल्ला झाला होता. […]

Continue Reading

रतन टाटांनी JNU विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नोकरी न देण्याचा निर्णय घेतला का? वाचा सत्य

टाटा ग्रुपचे माजी प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना टाटा ग्रुपमध्ये नोकरीवर न घेण्याचा निर्णय घेतला, अशी धदांत खोटी पोस्ट सोशल मीडियावर फिरवली जात आहे. भारतविरोधी घोषणांचा आरोप आणि शुल्कवृद्धीनंतरच्या आंदोलनामुळे जेएनयू विद्यापीठ चर्चेत राहते. येथील विद्यार्थ्यांप्रती समाजमाध्यमांत समर्थक आणि विरोधक असे दोन गट आहेत. या पार्श्वभूमीवर रतन टाटांच्या नावे […]

Continue Reading

इंदिरा गांधींनी सीताराम येचुरी यांना माफी मागण्यास भाग पाडले नव्हते. वाचा या फोटोमागील सत्य

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाबाबत (जेएनयू) अनेक दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. अशाच एका दाव्यानुसार, इंदिरा गांधी यांनी 1981 साली ‘जेएनयू’तील आंदोलन दडपण्यासाठी तेव्हाचे विद्यार्थी नेते सीताराम येचुरी यांना माफी मागण्यास भाग पाडले होते. एवढेच नाही तर त्यांना सर्वांसमक्ष राष्ट्रगीतसुद्धा म्हणायला लावले होते, असा दावा केला जात आहे. यावेळीचा फोटो म्हणून इंदिरा गांधी व विद्यार्थ्यांचे एक […]

Continue Reading

JNU विद्यार्थिनी आइशी घोषच्या उजव्या हाताला लागल्याचा फोटो खोटा आहे. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील वसतिगृहात गेल्या रविवारी झालेल्या हल्ल्यात JNUSU ची अध्यक्ष आइशी घोषला मारहाण करण्यात आली होती. यामध्ये तिच्या डोक्याला व हाताला जबर मार लागला. डोक्यातून रक्त येत असल्याचे तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर सध्या तिच्या डाव्या हाताला मार लागला की, उजव्या हाताला यावरून शंका उपस्थित केली जात आहे. काही […]

Continue Reading

JNU हल्ल्यात या SFI कार्यकर्त्याने मारहाणीचा बनाव केला होता का? विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वसतिगृहात झालेल्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण करण्यात आली. यात जखमी झालेला स्टुडेंट फेडरेशन ऑफ इंडियाचा (एसएफआय) कार्यकर्ता सूरी कृष्णन याचे हात व डोक्याला पट्टी बांधलेले फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले. परंतु, या फोटोंची आणि विमानतळावरील त्याचे धुमधडाक्यात झालेल्या स्वागताचे फोटो यांची तुलना करून त्याने मारहाण झाल्याचा बनाव केल्याचे […]

Continue Reading

2012 मधील लाठीचार्जचे फोटो सध्या सुरू असलेल्या जेएनयू आंदोलनाचे म्हणून व्हायरल. पाहा सत्य

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांनी वसतिगृहासह इतर शुल्कवाढीविरोधात सुरू केलेले आंदोलन शमण्याचे नाव घेत नाहीए. विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेरसुद्धा आंदोलन पसरू लागले असून, विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांना अनेक आंदोलकांवर गुन्हेदेखील दाखल केले आहेत. पोलिसांनी जेएनयू विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली. काय आहे […]

Continue Reading