भाजप नेते मंगेश चव्हाणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही; फेक ग्राफिक व्हायरल

विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाचे एक ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. हे ग्राफिक कार्ड शेअर करत दावा केला जात आहे की, “भाजप नेते मंगेश चव्हाणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी काँग्रेस उमेदवारांना पाडण्याचे आदेश दिले नाही; फेक ग्राफिक व्हायरल

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिण मतदार संघातील शिवसेना गटाच्या विरोधात उभे असलेले उमेदवार धर्मराज काडदी यांना पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाने कथितरित्या नाराजी व्यक्ती केली. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाचे एक ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. या ग्राफिकमध्ये दावा केला जात आहे की, “उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेस उमेदवारांना पाडाण्याचे आदेश दिले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी उर्दू भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली नाही; वाचा सत्य

गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझा वेबसाईटचे ग्राफिक कार्ड वापरून दावा केला जात आहे की, “उद्धव ठाकरेंनी मराठी प्रमाणे उर्दू भाषेलादेखील अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी मुस्लिम संघटनांना विधानसभा निवडणुकीत 15 % जागा देण्याचे आश्वासन दिले नाही; वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा वेबसाईटचे ग्राफिक कार्ड वापरून दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरेंनी मुस्लिम संघटनांना विधानसभा निवडणुकीत 15 % जागा देण्याचे आश्वासन दिले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक कार्ड आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट असून एबीपी माझाद्वारे शेअर करण्यात आलेले […]

Continue Reading

मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रात भाजपला काहीच परिणाम होणार नाही; असे अमित शाह म्हणाले का ? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या वेबसाईटचे ग्राफिककार्ड वापरून दावा केला जात आहे की, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतात की, मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रात भाजपला काहीच परिणाम होणार नाही.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिककार्ड आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिककार्ड बनावट आहे. एबीपी माझाने अशी कोणतीही बातमी शेअर केली नाही. काय […]

Continue Reading

एबीपी माझाच्या नावाने अमरावती लोकसभेची फेक ओपिनियन पोल आकडेवारी व्हायरल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या न्यूज चॅनलचे लोगो असलेले ओपिनियन पोल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यानुसार अमरावतीमध्ये काँग्रेसला सर्वात जास्त 44 टक्के मतदान मिळाले. पोस्ट शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की, व्हायरल ओपिनियन पोल एबीपी माझाने जाहीर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे, असे संजय राऊत म्हटले का ? वाचा सत्य

एबीपी माझा या वेबसाईटचे ग्राफिककार्ड वापरून दावा केला जात आहे की, खासदार संजय राऊत यांनी आपल्याच पक्ष प्रमुखाचा घरचा आहेर देत “उद्धव ठाकरे हे काहीही बोलतील त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे.” असे म्हटले. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक बनावट असून खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंविरोधात असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. काय […]

Continue Reading

‘उद्धव ठाकरे पळून गेले’: एबीपी माझाच्या नावाने बनावट ग्राफिक कार्ड व्हायरल, वाचा सत्य

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रामधील ठाकरे आणि शिंदे गटाच्या सत्ता संघर्षावर आपला निर्णय देताना सांगितले की, उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणी करण्याचे राज्यपालांचे निर्देश बेकायदेशीर होता; परंतु ठाकरेंनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याने त्यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करता येणार नाही.  या पर्श्वभूमीवर एबीपी माझाचा लोगो वापरून दावा केला जात आहे की, “उद्धव ठाकरे स्वत: पळून गेल्याने त्यांचे […]

Continue Reading

चंद्रकांत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंची माफी मागितल्याच्या खोट्या पोस्ट व्हायरल; वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ‘फडतूस गृहमंत्री’ म्हणून हेटाळणी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला.  शिंदे गटाच्या महिलांनी कार्यकर्त्यांनी ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना कथितरीत्या मारहाण केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर थेट इशारा दिला की, “या पुढे […]

Continue Reading

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद होण्यासंदर्भात अमोल कोल्हे आणि शरद पवारांविषयी फेक न्यूज व्हायरल. वाचा सत्य

‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार अशा बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. फेब्रुवारी अखेरीस ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा आहे. ही मालिका बंद होण्याविषयी सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.  दावा केला जात आहे की, शरद पवार यांच्या दबावामुळे ही मालिका होत असल्याचे डॉ. अमोल कोल्हे […]

Continue Reading

‘एबीपी माझा’चा फोटोशॉप केलेला सर्व्हे होतोय व्हायरल. वाचा सत्य काय आहे.

एबीपी माझा आणि सी-वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येणार असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. शेयर होत असेलल्या ‘एबीपी माझा’ चॅनेलवरील बातमीच्या कथित स्क्रीनशॉटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला 146 जागांवर विजय मिळेल तर, भाजप-शिवसेनेच्या युतीला 124 जागांवर समाधान मानावे लागेल असे दाखविण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली. काय आहे […]

Continue Reading

विधानसभा निवडणूक: एबीपी न्यूजच्या पोलमध्ये वंचितला 205 जागा मिळणार असे दाखविले का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यंदा सरकार बदलणार की, कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी वृत्तवाहिन्या ओपिनियन पोलद्वारे मतदारांचा कल चाचपडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा एक जनमत चाचणीत एबीपी न्यूज चॅनेलने येत्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला 205 जागा मिळण्याची शक्यता वर्तिविल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट […]

Continue Reading

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुढारी-एबीपी माझाचे जुने सर्वेक्षण केले जातेय शेयर. वाचा सत्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते. दिवाळीच्या आत राज्यातील निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच आचारसंहिता लागू होऊन, रणकंदन सुरू होईल. आपल्या पक्षाची वातावरण निर्मिती करण्यासाठी सगळ्याच पक्षांनी सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरू केलेला आहे. वृत्तवाहिन्यासुद्धा गावोगावी जाऊन जनतेचा कौल जाणून घेत आहेत.  अशाच एक जनमत चाचणीमध्ये विद्यमान भाजप-शिवसेनेच्या सरकारवर राज्यातील 61 […]

Continue Reading