युक्रेन आणि रशियाचा झेंडा घेऊन जोडप्याने काढलेला हा फोटो जुना; सध्या सुरू असलेल्या युद्धाशी त्याचा संबंध नाही

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जगभरातून रशियाविरोधात प्रतिसाद उमटत आहे. अशा पार्श्वभूमीवर युक्रेन आणि रशियाचा झेंडा अंगावर घेतलेल्या प्रेमी युगुलाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोसह दावा केल जात आहे की, युक्रेन आणि रशियाचा झेंडा घेतलेले हे कपल युद्धाचा नाही प्रेमाचा संदेश देत आहेत. दैनिक लोकमतच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो या दाव्यासह शेअर करण्यात […]

Continue Reading

कोरोनाला रोखण्यासाठी सांगितलेले हे उपाय कितपत योग्य आहेत? वाचा सत्य

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल मीडियावर विविध उपाय सुचविले जात आहेत. यातील अनेक गोष्टी चुकीच्या आहेत किंवा त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. अशाच पार्श्वभूमीवर एका मराठी दैनिकाने कोरोनाला रोखण्यासाठी काही प्रतिबंध उपाय सुचविले आहेत. मीठाच्या कोमट पाण्यात गुळण्या करण्यापासून ते 26 डिग्री तापमानात हा विषाणू तग धरू शकत नसल्याचे दावे यामध्ये करण्यात आले आहेत. फॅक्ट […]

Continue Reading

परभणीतील चिखलात रुतलेल्या बसचा फोटो दैनिकांनी औरंगाबाद-जळगाव रोडचा म्हणून छापला. वाचा सत्य

अजिंठासारख्या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी जाणाऱ्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे गेल्या अनेक दिवसांपासून हाल आहेत. पावसामुळे सर्वत्र चिखल साचलेला आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी तर या रस्त्यावर सामान्यबाब झाली आहे. सोशल मीडियावर याबाबत ओरड सुरू झाल्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेत आठ दिवसांत हा रस्ता दुरुस्त करण्याचा संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिला. या पार्श्वभूमीवर चिखलात […]

Continue Reading

टुथपेस्ट खरेदी करताना रंगीत मार्क तपासण्याचा मेसेज खोटा आहे. विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य वाचा

टुथपेस्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांविषयी ना ना प्रकारचे समज आहेत. त्यावरून संभावित धोक्यापासून लोकांना सावधान करणारे मेसेजेस सोशल मीडियावर फिरत असतात. असाच एक मेसेज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. टुथपेस्ट ट्यूबच्या मागील बाजूस असणाऱ्या काळी, निळी, लाल आणि हिरव्या रंगाच्या मार्कवरून (पट्टी) त्या टुथपेस्टमधील घटकांची माहिती मिळते, असे या मेसेजमध्ये सांगितले जाते. या प्रत्येक रंगाचा अर्थ […]

Continue Reading