निर्मला सीतारमन म्हणाल्या का, मोदी सरकारने 35 हजार कोटी LED BULBS वाटले?

False राजकीय | Political

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणात मोदी सरकारने 35 हजार कोटी LED BULBS वाटले असे म्हटल्याच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Kareem Shaikh यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. 

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी 

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणात मोदी सरकारने 35 हजार कोटी LED BULBS वाटले असे म्हटले आहे, आम्ही या बाबीची पडताळणी करण्यासाठी राज्यसभा टीव्हीवर जाऊन निर्मला सीतारमन यांनी केलेले भाषण तपासले. या भाषणात एक तास साठ मिनिटे आणि 15 व्या सेकंदाला त्यांनी यावर भाष्य केले आहे. त्यांनी स्पष्टपणे 35 कोटी म्हटल्याचे आपल्याला दिसून येते.  

भारत सरकारच्या अर्थसंकल्पाची माहिती असलेल्या संकेतस्थळासही आम्ही भेट दिली. याठिकाणी मुद्दा क्रमांक 74 वर आम्हाला याबाबतची माहिती दिसून आली. 

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

निर्मला सीतारमण यांनी नेमके काय म्हटले आहे हे आम्ही मराठीत स्वैर अनुवाद करुन दिले आहे.

 ‘चांगल्या जीवनमानासाठी, उत्तम पर्यावरणासाठी आणि शाश्वत उर्जेसाठी एलईडी बल्बचा घरगुती स्तरावर वापर करण्यासाठी सरकारने एलईडी बल्पचे वितरण करण्याचा एक मोठा कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमातंर्गत देशभरात साधे बल्ब आणि सीएफएल बल्प बदलण्यात आले. जवळपास 35 कोटी बल्ब उजाला योजनेतंर्गत वितरित करण्यात आले. ज्यामुळे वर्षाला 18341 कोटी रुपयांची बचत होत आहे. भारत आता साधे बल्प आणि सीएफएल मुक्त होत आहे. कारण आता अशा बल्बाचा वापर अतिशय कमी झाला आहे. आम्ही देशात सौर स्टोव आणि बॅटरी चार्जरचा उपयोग वाढविण्यासाठी आम्ही एलईडी बल्बसाठीच्या दृष्टीकोनाचा उपयोग करणार आहोत.’  

निष्कर्ष

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सरकारने 35 हजार कोटी नव्हे तर 35 कोटी एलईडी बल्बचे वाटप केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : निर्मला सीतारमन म्हणाल्या का, मोदी सरकारने 35 हजार कोटी LED BULBS वाटले?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False