निवृत्त कर्नल यतेंद्र यादव यांनी लिहिले पंतप्रधानांना पत्र : सत्य पडताळणी

True राष्ट्रीय सत्य

पुलवामा हल्ल्यानंतर सध्या सोशल मीडियावर एक पत्र आणि पोस्ट वायरल होत आहे. या पत्रामध्ये जम्मू – काश्मीरमधील संवेदनशील वातावरण आणि पुलवामा हल्ला यासंदर्भात लिहिलेले आहे. तसेच लष्कराच्या कारभारात राजकीय हस्तक्षेपामुळे पुलवामा सारखी घटना घडणारच होती. अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे.

Facebook l  अर्काईव्ह l

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर निवृत्त कर्नल यतेंद्र यादव यांनी लिहिले पंतप्रधानांना पत्र या पोस्टला 127 शेअर असून, 693 लाईक्स आहेत. राज सरकार या फेसबुक पेजवर हे पत्र आहे. याशिवाय EG NEWS मराठी या वेब पोर्टलवर हे पत्र आहे.

खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकता.

Facebook l अर्काईव्ह

EG NEWS मराठी l अर्काईव्ह

सौजन्य : EG NEWS मराठी

या पत्रात दिलेल्या फोन नंबरवर फॅक्ट क्रिसेंडो टीमने फोन केल्यानंतर असे आढळून आले की, पत्रात दिलेला फोन नंबर हा निवृत्त कर्नल यतेंद्र कुमार यादव यांचाच आहे.

त्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर बोलणे झाल्यानंतर आमच्या टीमने त्यांना सध्या वायरल होत असणाऱ्या पत्राबद्दल विचारले असता, त्यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे, असे सांगितले.  

मग त्यांनी फॅक्ट क्रिसेंडोला मुळ इंग्रजीमधील पत्र आम्हाला इमेलवर पाठवले. तसेच या मुळ इंग्रजी पत्राचे मराठी भाषांतर इतरांनी केले आहे, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे हे सत्य आहे की, निवृत्त कर्नल यतेंद्र कुमार यादव यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुलवामा हल्ल्यानंतर पत्र लिहिले आहे. तसेच हे पत्र त्यांनी आपले वैयक्तिक मत व्यक्त करण्याच्या उद्देशाने लिहिले आहे.  

डॉ. यतेंद्र कुमार यादव

अड्रेस – गौतम बुद्ध नगर, पीन कोड 201310

खाली दिलेल्या लिंकवर आपण निवृत्त कर्नल यतेंद्र कुमार यादव यांच्या बद्दल संपुर्ण माहिती वाचू शकता.

Linkdin l  अर्काईव्ह

निष्कर्ष : निवृत्त कर्नल यतेंद्र कुमार यादव यांनी लिहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र हे वृत्त खरे आहे.

Avatar

Title:निवृत्त कर्नल यतेंद्र यादव यांनी लिहिले पंतप्रधानांना पत्र : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: True