
उद्योग-धंद्याच्या काळजीत बुडालेल्या सर्व व्यावसायिकांसाठी रतन टाटा यांचा एक छोटासा संदेश म्ह्णून सध्या समाजमाध्यमात एक संदेश व्हायरल होत आहे. हा संदेश खरोखरच उद्योगपती रतन टाटा यांचा आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडो केली आहे.

तथ्य पडताळणी
उद्योगपती रतन टाटा यांनी उद्योग-धंद्याच्या काळजीत बुडालेल्या सर्व व्यावसायिकांसाठी खरोखरच असा काही संदेश दिला आहे का? हे जाणून घेण्यासाठी रतन टाटा यांच्या ट्विटर खात्याला आम्ही सर्वप्रथम भेट दिली. त्याठिकाणी 3 मार्च 2020 रोजी त्यांनी केलेले एक ट्विट दिसून आले. या संदेशाबद्दल काळजी व्यक्त करत त्यांनी अशा माहितीचा स्रोत पडताळत मगच त्यावर विश्वास ठेवावा, असे म्हटले आहे. माझ्या छायाचित्रासोबत दिलेला संदेश माझाच असेल असे नव्हे, हा प्रश्न अनेकांना भेडसावत असल्याचेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय.
निष्कर्ष
उद्योगपती रतन टाटा यांनी 2020 हे साल फक्त जिवंत रहायचे वर्ष आहे, असा कोणताही संदेश दिलेला नाही. त्याच्या नावाने आणि छायाचित्रासह व्हायरल होत असलेला संदेश असत्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Title:रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल होत असलेला संदेश असत्य; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
