Fact Check : उदयनराजे बनणार खासदार, पृथ्वीराज चव्हाणांनी असे वक्तव्य केलंय का?

False राजकीय | Political

बघा स्वतः पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की उदयनराजे बनणार खासदार, अशी माहिती UdyanRaje एकच ध्यास, साताऱ्याचा विकास या पेजवरुन पोस्ट करण्यात आली आहे, या पोस्टसोबतच एक व्हिडिओ देण्यात आला असून या व्हिडिओत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे असे वक्तव्य करताना दिसत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच किंवा विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान असे वक्तव्य केलंय का? त्यांनी असं वक्तव्य नेमकं कधी केलं, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयनराजे बनणार खासदार असे वक्तव्य केले आहे का, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला दैनिक सकाळने 16 ऑक्टोबर 2019 रोजी प्रसिध्द केलेले वृत्त दिसून आले. या वृत्तात माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केल्याचे दिसून येते. या वृत्तात पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयनराजे हे दोन लाखाच्या मतांनी पराभूत होतील, असे भाकित वर्तवले आहे. त्यावर उदयनराजेंनी पत्रकाद्वारे पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केल्याचे म्हटले आहे. 

दैनिक सकाळ / Archive

पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारात उदयनराजेंवर टीका केली आहे, तर मग त्यांनी उदयनराजे बनणार खासदार असे वक्तव्य कधी केले होते असा प्रश्न आम्हाला पडला. आम्ही मग हा व्हिडिओ नीट पाहिला. यात एका ठिकाणी आम्हाला उदयनराजे यांच्या वाढदिवसाचा जंगी सोहळा असे लिहिलेले दिसून आले. आपण ही बाब खाली पाहू शकता. 

यावरुन हे स्पष्ट झाले की उदयराजे यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केले असावे. आम्हाला युटूयूबवर या सोहळ्याचा व्हिडिओ एक वर्षापुर्वीचा असल्याचे दिसून आला.

नेटवर्क 18 च्या संकेतस्थळावरही हा व्हिडिओ 24 फेब्रुवारी 2018 चा असल्याचे आपण खाली पाहू शकता. 

Archive 

उदयनराजे हे 15, 16 आणि 17 व्या लोकसभेच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते. लोकसभेच्या संकेतस्थळावरील याबाबतची माहिती आपण खाली पाहू शकता. सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ हा 18 मे 2014 ते 25 मे 2019 असल्याचेही आपण लोकसभेच्या संकेतस्थळावर पाहू शकता. या कार्यकाळात देशात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. त्यामुळे 2018 मधील या सोहळ्यास उपस्थित राहून पृथ्वीराज चव्हाणांनी हे वक्तव्य केल्याचे दिसून येते.

या संशोधनातून हे सिध्द होत आहे की, राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचा हा जुना व्हिडिओ पसरविण्यात येत आहे. आपण खाली खऱ्या आणि खोट्या माहितीसह पसरणाऱ्या व्हिडिओची तुलनाही पाहू शकता

निष्कर्ष  

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयनराजे बनणार खासदार असे वक्तव्य 2018 मध्ये केले होते. त्यावेळी उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते. हा जुना व्हिडिओ आता संभ्रम निर्माण करण्यासाठी पसरविण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत त्यामुळे ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : उदयनराजे बनणार खासदार, पृथ्वीराज चव्हाणांनी असे वक्तव्य केलंय का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False