
भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या बलात्काराचा आरोप असणाऱ्या स्वामी चिन्मयानंद यांचा आर्शीवाद घेताना, अशी माहिती असलेले एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमांमध्ये पसरत आहे. छाया थोरात यांनी असेच एक छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे हे छायाचित्र खरे आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी जो परिणाम मिळाला. त्यात आम्हाला खासदार स्मृती इराणी यांचे एक ट्विट दिसून आले. हिंदी भाषेत असलेल्या या ट्विटचे आम्ही मराठी भाषांतर केले असून या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, छायाचित्रात दिसणारी व्यक्ती ही हुकुमदेव नारायण यादव आहेत. पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हे 1960 पासून देशाची सेवा करत आहेत. दलितांच्या आणि गरीबांच्या कल्याणासाठी हुकुमदेव यांनी अभुतपूर्व काम केले आहे. माझा नमस्कार त्यांनी स्वीकारला हे माझे सौभाग्य आहे.
या ट्विटखालीच एक ट्विट दिसून येत असून हे ट्विट इंद्रायणी मिश्रा यांचे असल्याचे आपण पाहू शकतो. मिश्रा यांचे मूळ ट्विट डिलीट करण्यात आले असले तरी या स्क्रीनशॉट या ठिकाणी शेअर करण्यात आला आहे तो आपण पाहू शकता.
हुकुम नारायण यादव आणि स्वामी चिन्मयानंद यांच्यातील फरक दर्शविणारे छायाचित्रही आम्ही खाली देत आहोत.
स्मृती इराणी यांनी हुकूम नारायण यादव यांच्याविषयी केलेल्या ट्विटबद्दलचे वृत्त जनसत्ता या संकेतस्थळानेही प्रसिध्द केले आहे.
निष्कर्ष
भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या बलात्काराचा आरोप असणाऱ्या स्वामी चिन्मयानंद यांना नमस्कार केल्याचे हे छायाचित्र नाही. छायाचित्रात दिसणारी व्यक्ती ही हुकुमदेव नारायण यादव आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact : स्मृती इराणी यांनी नमस्कार केलेली व्यक्ती स्वामी चिन्मयानंद नसून हुकूम यादव
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
