कोरोना आणि चक्रीवादळ यासह अनेक नैसर्गिक संकटांनी संपूर्ण जग हैराण आहे. अशातच एक विचित्र व्हिडियो व्हायरल होत आहे. यामध्ये हजारो कावळ्यांचा थवा वाहने आणि रस्त्यांवर ठाण मांडून बसेलला दिसतो. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, हा व्हिडियो दुबई येथील असून, तेथे कावळे लोकांना घरू पडू देत नाहीत.

फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत शोध घेतला असता कळाले की, हा व्हिडियो आताचा नसून, चार वर्षांपूर्वी अमेरिकेत झालेल्या घटनेचा आहे.

काय आहे व्हिडियोमध्ये?

एका मॉलबाहेरील पार्किंगमध्ये हजारो कावळे वाहने आणि रस्त्यावर बसल्याचे व्हिडियोत दिसते. कावळ्यांना पाहून लोक आश्चर्याने ओरडत आहेत. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, परमेश्वराचा म्हणा किंवा निसर्गाचा म्हणा पण पृथ्वीवर सध्या कोप आहे. दुबईत नवीन संकट सध्या चालू आहे, कावळे माणसाला बाहेर पडू देत नाहीत.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून त्याची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली.

तथ्य पडताळणी

व्हिडियोच्या सुरुवातीला एका इमारतीवर MART असे लिहिलेले दिसते. त्यानुसार की-वर्ड्सद्वारे शोध घेतला असता समजले की, हा व्हिडियो दुबईतील नाही.

‘व्हायरल हॉग’ नावाच्या व्हायरल कटेंट क्युरेट करणाऱ्या युट्युब चॅनेलवर सदरील व्हिडियो आढळला. यासोबत दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडियो अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील कार्लटन येथील आहे. 6 डिसेंबर 2016 रोजी तेथील एच-मार्ट मॉलच्या पार्किंगमध्ये हा व्हिडियो चित्रित करण्यात आला होता. आणि या पक्ष्याचे नाव ब्लॅकबर्ड्स आहे.

https://www.youtube.com/watch?v=h7Ti-O8MByY

हा व्हिडियो चित्रित करणाऱ्या महिलेने सांगितले की, ती मॉलमधून सामान खरेदी करून बाहेर पडली असता पार्किंगमध्ये सर्वत्र ब्लॅकबर्ड्स होते. हजारो पक्ष्यांनी संपूर्ण जागा आणि आकाश व्यापून टाकलेले होते. ती स्वतः कशीबशी गाडीत बसली आणि हा व्हिडियो चित्रित केला.

मग गुगल मॅपच्या सहाय्याने कार्लटन शहरातील एच-मार्ट हा मॉल शोधला. खाली एम्बेड केलेल्या गुगल मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्हिडियोमध्ये हीच जागा आहे.

मूळ जागा येथे पाहा – गुगल मॅप

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, अमेरिकेतील 2016 मधील ब्लॅकबर्ड्सचा व्हिडियो दुबईतील आताचा म्हणून व्हायरल होत आहे. त्यामुळे दुबईमध्ये कावळे लोकांना बाहेर पडू देत नाही, हा दावा असत्य आहे.

Avatar

Title:दुबईमध्ये लोकांना कावळे घराबाहेर पडू देत नाहीत का? वाचा त्या व्हायरल व्हिडियोमागचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False