लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्यक्ती मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीन फोडताणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही घटना सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात घडली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यानचा आहे.

काय आहे दावा ?

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यात दि. 19-04-2024 रोजी मतदान झाले. यावेळी एक मतदार EVM Voting मशिनवर आपला राग व्यक्त करताना दिसून येत आहे. त्याने अक्षरशः EVM Voting मशिन फोडली.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना गेल्यावर्षी कर्नाटकमध्ये घडली होती.

केबल न्यूज नेटवर्कने आपल्या युट्यूब चॅनलवर 12 मे 2023 रोजी हा व्हिडिओ अपलोड केला होता. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये महिती दिली की, ही घटना कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 दरम्यान तेथील म्हैसूर शहरात घडली होती.

https://youtube.com/shorts/nB_3GfrRaL0?si=jOiORYTgE4G2LzlS

आर्काइव्ह

स्टार ऑफ म्हैसूरच्या बातमीनुसार कर्नाटकमधील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या हुतागल्ली येथील मतदान केंद्रावरील बॅलेट कंट्रोल युनिटची नासधूस केल्याप्रकरणी विजयनगर पोलिसांनी शिवमूर्ती (वयवर्ष 48) व्यक्तीला अटक केली होती.

विजयनगर पोलिसांनी सांगितले की, सदरील व्यक्ती मनोरुग्ण होता. त्याची चौकशी करून त्याला सोडण्यात आले.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाही. ही घटना 2023 साली कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान म्हैसूर शहरात घडली होती. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मतदान केंद्रामध्ये इव्हीएम मशीन फोडतानाचा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading