इस्रायलमधील एअरबेसवरील इराणच्या हल्ल्याचा दावा खोटा; जुना व्हिडिओ भ्रामक पद्धतीने व्हायरल

False international

मिडल ईस्टमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका घराला लागलेली आग अग्निशमन विझवताना दिसतात. 

दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ इस्रायलच्या नेवातिम एअरबेसवरील इराणच्या हल्ल्याचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ जुना असून किरयात शमोना येथील रॉकेट हल्ल्यानंतरच्या आगीचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एका घराला भीषण आग लागलेली दिसते आणि अग्निशमन कर्मचारी आग विझवताना दिसतात. तसेच काही ठिकाणी इस्रायली सैनिकही दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “इराणने इस्रायली हवाई दलाच्या सर्वात मोक्याच्या तळांपैकी एक असलेल्या नेवातिम हवाई तळावर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. या तळावर एफ-35 आय “अदिर” स्टेल्थ लढाऊ विमाने, सी-130 वाहतूक विमाने आणि इतर अनेक विमाने तैनात आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

गुगल इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2023 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

द जेरूसलेम पोस्ट’ने 29 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये व्हायरल व्हिडिओसारखा स्क्रीनशॉट आढळला.

या रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ इस्रायलमधील किरयात शमोना येथे रॉकेट हल्ल्यानंतर लागलेल्या आगीचा आहे.

पुढे ‘सी14’ या इस्रायली न्यूज वेबसाइटवरही याच घटनेशी संबंधित फोटो आणि माहिती मिळाली. त्यामध्येही हा प्रकार किरयात शमोना येथे घडल्याचे सांगितले आहे.

तसेच, वॉशिंग्टन पोस्टने 30 ऑक्टोबर 2023 रोजी शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, लेबनॉनकडून 29 ऑक्टोबर रोजी ‘किरयात शमोना’ भागावर दोन मिसाईल डागण्यात आले होते.

टाइम्स ऑफ इस्रायल आणि इस्रायल नॅशनल न्यूजच्या रिपोर्टनुसार, 9 ऑक्टोबर 2023 रोजी देखील या भागात रॉकेट पडल्याने एका घराला आग लागली होती.

याचप्रमाणे 29 ऑक्टोबर 2023 रोजी एका इस्रायली अकाउंटने केलेल्या पोस्टमध्येही हा व्हायरल व्हिडिओ किरयात शमोना येथील असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे स्पष्ट होते की इस्रायलच्या नेवातिम एअरबेसवरील हल्ल्याचा दावा करत हा व्हिडिओ भ्रामक पद्धतीने शेअर केला जात आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ नेवातिम एअरबेसवरील इराणच्या हल्ल्याशी कोणताही संबंध नाही. मुळात हा व्हिडिओ इस्रायलमधील किरयात शमोना येथे 2023 मध्ये झालेल्या रॉकेट हल्ल्यानंतर लागलेल्या आगीचा आहे. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्याव्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोलाफेसबुक,इन्स्टाग्रामट्विटरयेथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: इस्रायलमधील एअरबेसवरील इराणच्या हल्ल्याचा दावा खोटा; जुना व्हिडिओ भ्रामक पद्धतीने व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *