तृप्ती देसाई यांना लॉकडाऊनमध्ये अटक करण्यात आलेली नाही. हा व्हिडिओ जुना आहे.

False सामाजिक

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात टाळाबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना अवैधरीत्या दारू खरेदी करताना पोलिसांनी अटक केली म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडियोमध्ये पोलीस देसाई यांना गाडीमध्ये बसून घेऊन जात असल्याचे दिसते.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या व्हिडियोची सत्य पडताळणी करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती हा व्हिडियो जुना असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

फेसबुकवरील मूळ पोस्ट

तथ्य पडताळणी

लॉकडाऊन असताना ब्लॅकने दारु घेताना तृप्ती देसाईंना खरंच अटक करण्यात आली का? याचा शोध घेतला. त्यावेळी द टाईम्स ऑफ इंडियाने 15 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. दारुबंदीच्या मागणीसाठी तृप्ती देसाई या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाटल्यांचा हार घालणार असल्याने त्यांना पुण्यातील सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

screenshot-timesofindia.indiatimes.com-2020.png

द टाईम्स ऑफ इंडियाचे सविस्तर वृत्त / Archive

ही क्लिप व्हायरल झाल्यावर स्वत: तृप्ती देसाई यांनी देखील याबाबतचा खुलासा करत ही क्लिप 15 सप्टेंबर 2019 रोजी पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले तेव्हाची असल्याचे स्पष्ट केले. 

https://www.facebook.com/trupti.desai.589/posts/2882104411879462

फेसबुकवरील मुळ पोस्ट | आर्काइव्ह

यावरुन हे स्पष्ट झाले की, तृप्ती देसाई यांच्या  अटकेचा हा जुना व्हिडिओ आहे. 

दारुबंदीसाठी केलेल्या आंदोलनाच्यावेळी ताब्यात घेण्यात आले. हा व्हिडिओ असत्य माहितीसह समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे.

निष्कर्ष

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दारुबंदीसाठी केलेल्या आंदोलनाच्यावेळी त्यांना 15 सप्टेंबर 2019 रोजी ताब्यात घेण्यात आले होते. हा व्हिडिओ त्याचा आहे. म्हणून लॉकडाऊनदरम्यान देसाई यांना अवैधरित्या दारू खरेदी करताना अटक करण्यात आले हा दावा खोटा आहे.

Avatar

Title:तृप्ती देसाई यांना लॉकडाऊनमध्ये अटक करण्यात आलेली नाही. हा व्हिडिओ जुना आहे.

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False