
प्रियंका गांधी या वाघिण आहेत आणि मी त्या वाघिणीचे दूध पितो, असे वक्तव्य काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी केल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे का? याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही हे छायाचित्र गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोधले. त्यावेळी हे छायाचित्र पीटीआय या वृत्तसंस्थेने हैदराबाद येथील गांधी भवनमध्ये 30 नोव्हेंबर 2018 रोजी घेतल्याचे दिसून येते. द इंडियन एक्सप्रेसने 1 डिसेंबर 2018 रोजी आपल्या संकेतस्थळावर हे छायाचित्र प्रसिध्द केलेले आहे.
अमर उजाला या दैनिकाने एक मार्च 2019 रोजी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या 4 वादग्रस्त विधानांविषयी एक वृत्त दिले आहे. या वृत्तामध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रियंका गांधींविषयी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केल्याचे मात्र दिसून येत नाही.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विषयी सगळ्यात ताजे वृत्त काय आहे, हे शोधण्याचाही आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी नुकतीच प्रियंका गांधी यांची भेट घेतल्याचे दिसून येते. त्यानंतर त्यांनी याचे छायाचित्रही प्रसिध्द केले आहे. त्यांचे हे ट्विट तुम्ही खाली पाहू शकता.
एनडीटीव्हीने या भेटीबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तातही त्यांनी प्रियंका गांधी यांच्याबद्दल कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दिसून येत नाही.
निष्कर्ष
नवज्योत सिंग सिद्धू यांनी वेळोवेळी वादग्रस्त विधाने केली असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी प्रियंका गांधी यांच्याबद्दल मात्र कोणतेही वादग्रस्त विधान केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रियंका गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
