शाळेतील शिक्षिकेला भेटतानाचा हा व्हिडिओ सुंदर पिचाईंचा नाही; वाचा सत्य

False सामाजिक

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई त्यांची शाळेतील शिक्षिका मौली अब्राहम यांना 27 वर्षांनंतर त्याच्या घरी जाऊन भेटतात तेव्हा, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात सुंदर पिचाई यांचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सुंदर पिचाई यांचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई त्यांची शाळेतील शिक्षिका मौली अब्राहम यांना 27 वर्षांनंतर त्याच्या घरी जाऊन भेटल्याचा हा व्हिडिओ आहे का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नीट पाहिला. त्यावेळी या व्हिडिओच्या सुरूवातीलाच गणेश कोहली IC3 CONFERENCE CHAIR असे लिहिले असल्याचे दिसून आले. त्यानंतर गणेश कोहली हे कोण आहेत, याचा शोध घेतला. त्यावेळी गणेश कोहली यांचे वैयक्तिक संकेतस्थळ दिसून आले. या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार ते उद्योजक, शिक्षक आणि सल्लागार असल्याचे म्हटले आहे. गणिताच्या शिक्षिका मौली अब्राहम यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी हे शैक्षणिक कार्य सुरू केल्याचे त्यांनी याठिकाणी म्हटले आहे. 

Ganesh.png

संग्रहित

समाजमाध्यमात सुंदर पिचाई यांच्या नावाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील या ठिकाणी दिसून आला. हा व्हिडिओ एक सप्टेंबर 2017 रोजी अपलोड करण्यात आल्याचे दिसून येते.

संग्रहित

गणेश कोहली यांनी स्वत: देखील हा व्हिडिओ ट्विट करत हे सुंदर पिचाई नसल्याचे 14 ऑगस्ट 2020 रोजी स्पष्ट केले.

संग्रहित

यातून हे स्पष्ट झाले की, या व्हिडिओत शिक्षिका मौली अब्राहम यांच्यासोबत दिसणारे सुंदर पिचाई नसून आयसी3 इन्स्टिटयूटचे गणेश कोहली आहेत. आयसी3 इन्स्टिटयूटच्या संकेतस्थळ असलेल्या माहितीनुसार ही एक शैक्षणिक विषयांवर सल्ला देणारी भारत आणि अमेरिकेत कार्यरत असलेली संस्था असल्याचे दिसून आले. कोहली हे या संस्थेचे संस्थापक असल्याचे या ठिकाणी म्हटले आहे. 

निष्कर्ष

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई त्यांची शाळेतील शिक्षिका मौली अब्राहम यांना 27 वर्षांनंतर त्याच्या घरी जाऊन भेट घेतल्याचा म्हणून व्हायरल झालेला व्हिडिओ हा आयसी3b इन्स्टिटयूटचे गणेश कोहली यांनी त्यांच्या शिक्षिका मौली अब्राहम यांच्या घेतलेल्या भेटीचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुंदर पिचाई यांचा असल्याचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:शाळेतील शिक्षिकेला भेटतानाचा हा व्हिडिओ सुंदर पिचाईंचा नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False