
गुजरात विधानसभेचे दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी पार पडले. या निवडणुकीमध्ये ‘गुजरात मॉडेल’ आणि ‘गुजरात विकास’ या दोन गोष्टींची बरीच चर्चा झाली. याचाच भाग म्हणून अनेक डझन बुलेट ट्रेन्स उभ्या असल्याचा एक डोळे दिपवून टाकणारा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गुजरातमध्ये दाखल झालेल्या बुलेट ट्रेन्सचा हा फोटो आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला फोटो गुजरातमधील नसून, चीनमधील आहे.
काय आहे दावा?
बुलेट ट्रेन्सचा हा फोटो शेअर करून म्हटले की, “विश्वास बसणार नाही पण हा गुजरातचा फोटो आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | फेसबुक । फेसबुक
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हायरल फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की हा फोटो किमान 2018 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. एका ट्विटर युजरने हा फोटो चीनमधील वुहान येथील असल्याचा शेअर केला होता.
विज्ञान व तंत्रज्ञानाविषयक माहिती शेअर करणाऱ्या मासिमो याने हा फोटो चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान स्थित स्टेशनमध्ये मेंटेनन्ससाठी उभ्या असलेल्या बुलेट ट्रन्सचा म्हटला होता.
हा धागा पकडून शोध घेतल्यावर गेटी इमेजेस या स्टॉक फोटो वेबसाईटवर अशाच प्रकारचे अनेक फोटो सापडले.
सोबतच्या माहितीनुसार, हा फटो 1 फेब्रुवारी 2018 रोजी वुहान मेटेंनन्स बेस येथ काढण्यात आला होता. चीनमध्ये होणाऱ्या स्प्रिंग फेस्टव्हलच्या तयारीसाठी या बुलेट ट्रेन्स सज्ज करण्यात आल्या होत्या.

मूळ फोटो – गेटी इमेज

मूळ फोटो – गेटी इमेज
वुहानमधील या स्टेशनचा व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे. एरिअल व्ह्युवमध्ये तुम्ही पाहू शकता.
तथ्य पडताळणी
यावरून स्पष्ट होते की, हा फोटो एक तर जुना असून, चीनमधील वुहान शहरातील आहे. चुकीच्या दाव्यासह गुजरातचा म्हणून शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:चीनमधील बुलेट ट्रेनचा फोटो गुजरातचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
