ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय देवीदेवतांची प्रतिमा असलेले कॉइन तयार केले होते का?

False सामाजिक

ईस्ट इंडिया कंपनीने 1818 मध्ये भारतीय देवीदेवतांची प्रतिमा असलेले कॉइन तयार केले होते, असा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. दोन आण्याच्या या नाण्याचे फोटीसुद्धा शेयर केले होत आहेत.  उदय धोंडेगोरखनाथ दुसाने यांनीही अशीच माहिती देत हे छायाचित्र पोस्ट केले आहे. मग ईस्ट इंडिया कंपनीने 1818 मध्ये खरोखरच अशी नाणी जारी केली होती का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

Goraknath Dusane FB Post.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी

या नाण्यांविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही शोध घेतला. त्यावेळी आम्हाला एका ब्लॉगवर खालील माहिती दिसून आली. या ब्लॉगमध्ये वेगवेगळ्या नाण्यांविषयी माहिती दिसून आली. या ब्लॉगवर  ईस्ट इंडिया कंपनीच्या नावे सांगितले जाणारे नाणे बनावट असल्याचे म्हटले आहे. 

image5.jpg

 smallestcoincollector.blogspot.com / Archive 

त्यानंतर आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर काही माहिती मिळते का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. यात देण्यात आलेल्या माहितीनुसार ईस्ट इंडिया कंपनी तीन भागात कार्यरत होती. मुंबई (तत्कालीन बॉम्बे) , मद्रास आणि बंगाल हे ते तीन भाग होते. 1835 पर्यंत भारताच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशात किंग विल्यम यांची नाणी प्रचलित होती. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी अंतर्गत तीन भागात चलनात असलेल्या नाण्यांच्या प्रतिमा आरबीआयच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. 

image8.jpg

RBI History of Coins / Archive

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात सुरू झालेल्या नाण्याच्या प्रतिमा या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नाहीत. ब्रिटीश इंडियाच्या काळातील क्वीन व्हिक्टोरियाची नाणी मात्र आरबीआयच्या संकेतस्थळावर दाखविण्यात आलेली आहेत. 

image6.jpg

राष्ट्रीय संग्रहालयाचे प्रवक्ते सनजीब सिंग यांनी इंडिया टूडेला याबाबत सांगितलें की, ईस्ट इंडिया कंपनीने भारतात नाणी जारी केली मात्र त्यातील एकही नाणे देवी-देवतांचे नव्हते. पुरातत्व विभागाचे अभ्यासकही असलेल्या सिंग यांनी सांगितले की, पुरातन काळात दक्षिण भारतात मात्र देवी-देवतांची नाणी होती.

image4.jpg

India Today  / Archive

निष्कर्ष

ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतात जारी करण्यात आलेल्या नाण्यामध्ये देवी-देवता अथवा धार्मिक चिन्हे असलेल्या नाण्याचा समावेश नसल्याचे आरबीआयच्या संकेतस्थळावरील माहितीवरुन स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय देवीदेवतांची प्रतिमा असलेले कॉइन तयार केले होते का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False