
मणिपूरमधील अप्रतिम फुटबॉल मैदानाचे म्हणून सध्या समाजमाध्यमात एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र खरोखरच मणिपूर या राज्यातील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
मणिपूरमधील फुटबॉलच्या मैदानाचे हे अप्रतिम छायाचित्र आहे का, याचा शोध घेण्यासाठी हे छायाचित्र रिव्हर्स इमेज शोधले. त्यावेळी हे छायाचित्र 2016 पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे दिसून आले. रशियन फुटबॉल न्यूजनेही हे छायाचित्र 2018 मध्ये ट्विट केल्याचे दिसून येते. मॉस्कोतील Meshchersky Park येथील फुटबॉल मैदानाचे हे छायाचित्र असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे. UNILAD या व्हेरिफाईड ट्विटर खात्यावरही हे छायाचित्र रशियाची राजधानी मॉस्कोतील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ते आपण खाली पाहू शकता.
ब्रिटनमधील द सन (संग्रहित) या वृत्तपत्राच्या संकेतस्थळानेही हे छायाचित्र प्रसिध्द केले आहे. ते मॉस्कोतील Meshchersky Park येथील असल्याचे म्हटले आहे. अनेक रशियन संकेतस्थळांनीही हे रशियातील मॉस्कोतील फुटबॉलचे मैदान असल्याचे म्हटले असल्याचेही दिसून येते.
निष्कर्ष
मणिपूरमधील फुटबॉलच्या मैदानाचे हे छायाचित्र असल्याचे असत्य आहे. हे रशियाची राजधानी मॉस्कोतील एका फुटबॉल मैदानाचे छायाचित्र आहे.

Title:फुटबॉल मैदानाचे हे छायाचित्र मणिपूरमधील नाही तर रशियातील; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
