शाहरुख खानच्या पठाण सिनेमाचा म्हणून फेक ट्रेलर व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

‘सडक 2’ सिनेमाच्या ट्रेलरवर डिसलाईक्सचा वर्षाव केल्यानंतर सोशल मीडियावरील ट्रोलआर्मीचा रोख आता शाहरुख खानच्या आगामी सिनेमाकडे वळला आहे. सोशल मीडियावर वावड्या उठल्या आहेत की, शाहरुखच्या ‘पठाण’ नावाच्या एका कथित सिनेमाचा ट्रेलर युट्यूबवर रिलीज झाला आहे. त्याला डिसलाईक करण्याचे आवाहन केले जात आहे. याद्वारे धार्मिक विद्वेषपूर्ण टिप्पणीदेखील केली जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची पडताळणी केल्यावर लक्षात आले की, नेटीझन एका खोट्या ट्रेलरलाच खरं समजत आहेत.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येते पाहा – फेसबुकअर्काइव्ह

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

शाहरुख खानचा शेवटचा चित्रपट ‘झीरो’ 2018 साली प्रदर्थित झाला होता. त्यानंतर त्याचा एकही चित्रपट रिलीज तर सोडा पण घोषितही झाला नाही. त्याचा पुढचा चित्रपट कोणता असेल याबाबत केवळ अंदाल लावले जात आहेत. 

यशराज फिल्म बॅनरसोबत तो ‘पठाण’ नावाचा सिनेमा करणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, शाहरुख किंवा यशराज फिल्म या दोन्हींकडूनही याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शाहरुख नेहमी स्वतः त्याच्या चित्रपटाची घोषणा करत असतो. त्यामुळे तो ‘पठाण’ नावाचा सिनेमा करतोय हा केवळ कयास आहे.

मग हा ट्रेलर कसा आला?

युट्यूबवर पठाण चित्रपटाचा ट्रेलर असे शोधले असता विविध व्हिडियो समोर येतात.

या पैकी एकही व्हिडियो अधिकृत नाही. विशेष म्हणजे थंबनेल इमेज म्हणून ‘रईस’ चित्रपटातील फोटो वापरण्यात आला आहे. सर्व व्हिडियो हे शाहरुखच्या विविध चित्रपटांतील क्लिप्स एकत्र करून तयार करण्यात आलेले फॅन मेड ट्रेलर्स किंवा कन्सेप्ट ट्रेलर्स आहेत.

युनिव्हर्सल फिल्म स्टुडियो नावाच्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडियोखाली तसे नमुदही केले आहे की, ‘पठाण’ फिल्मचे ट्रेलर हे केवळ फॅन-मेड आहे. ते खरे नाही. परंतु, लोकं याला खरे मानून डिसलाईक आणि धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या कमेंट करीत आहेत.

मूळ व्हिडियो येथे पाहा – युट्यूब

निष्कर्ष

शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ सिनेमाचे ट्रेलर म्हणून एक फॅन-मेड व्हिडियो व्हायरल होत आहे. या ट्रेलरला खरे समजून लोक त्याला डिसलाईक करून या सिनेमावर बहिष्कार करण्याचे आवाहन करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी यावर विश्वास ठेवू नये.

Avatar

Title:शाहरुख खानच्या पठाण सिनेमाचा म्हणून फेक ट्रेलर व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False