‘दैनिक भास्कर’ने सावरकारांची खिल्ली उडवणारे ट्विट केलेले नाही; वाचा सत्य

False राजकीय | Political

दैनिक भास्कर समूहाच्या विविध कार्यालयांवर गेल्या आठवड्यात आयकर विभागाने छापेमारी केली. या कारवाईमागे कर चोरी प्रकरण असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईवरोधात प्रतिक्रिया म्हणून भास्कर समुहातर्फे ‘मैं स्वतंत्र हूं क्योंकि मैं भास्कर हूं’ अशी मोहिमदेखील राबविण्यात आली. 

या पार्श्वभूमीवर दैनिक भास्करच्या नावाने सावरकरांची खिल्ली उडवणारे एक कथित ट्विट व्हायरल होत आहे. त्यामुळे भास्कर समुहाचे मराठी वृत्तपत्र दिव्य मराठीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे ट्विट बनावट आढळले.

काय आहे दावा?

‘दैनिक भास्कर’ नावाच्या एका कथित ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या कथित ट्विटमध्ये म्हटले की, “मैं वीर सावकर नहीं जो डर जाऊं, मैं स्वतंत्र हूं, क्योंकि मैं दैनिक भास्कर हूं”

हा स्क्रीनशॉट शेअर करून कॅप्शमध्ये म्हटले की, “आजपासून दैनिक भास्करच्या महाराष्ट्रातील दिव्य मराठी आवृत्तीवर पूर्ण बहिष्कार टाका सर्वांनी. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर आणि कॉपी पेस्ट करा!”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा स्क्रीनशॉट खरंच दैनिक भास्करच्या अधिकृत अकाउंट करण्यात आलेल्या ट्विटचा आहे का, हे तपासून बघू.

दैनिक भास्करचे अधिकृत ट्विटर हँडल @DainikBhaskar असे आहे. परंतु, व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटमध्ये ट्विटर हँडल “DainkBhaskar1” असे आहे. हे दोन्ही वेगवेगळे अकाउंट आहेत.

दैनिक भास्कर समुहाचे अधिकृत ट्विटर अकाउंट.

विशेष म्हणजे DainkBhaskar1 हे अकाउंट आता अस्तित्वातदेखील नाही. दैनिक भास्करच्या नावाने तयार करण्यात आलेले ते बनावट अकाउंट डिलीज करण्यात आलेले आहे.

दैनिक भास्करच्या नावाने तयार करण्यात आलेले बनावट ट्विटर अकाउंट.

आयकर विभागाच्या छापेमारीनंतर भास्कर समुहाने ‘स्वतंत्र भास्कर’ मोहिम हाती घेतली होती. त्याअंतर्गत अधिकृत अकाउंटवरून खालील ट्विट करण्यात आले होते. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, दैनिक भास्करतर्फे सावकरांविरोधात आक्षेपार्ह ट्विट करण्यात आलेले नाही. तसा दावा करणारे ते ट्विट बनावट अकाउंटद्वारे करण्यात आलेले आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:‘दैनिक भास्कर’ने सावरकारांची खिल्ली उडवणारे ट्विट केलेले नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False