प्रकाश आंबेडकर यांनी बाईकवरुन जाऊन उमेदवारी अर्ज भरला का? : सत्य पडताळणी

True राजकीय | Political

सोशल मीडियावर प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये लाखो लोकांची गर्दी असल्यामुळे बाळासाहेबांनी टू व्हीलरने जाऊन सोलापूरातुन उमेदवार अर्ज भरण्यात आला, असे म्हणण्यात आले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होईपर्यंत फेसबुकवरील रोहित गायकवाड अकाउंटवरुन व्हायरल होत आहे.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटो संदर्भात सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही फेसबुकवर प्रकाश आंबेडकर यांचे ऑफिशिअल पेजवर व्हायरल फोटो शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या फेसबुक पेजवर लोकसभा निवडणूक 2019 साठी निवडणूक अर्ज भरतानाचे फोटो सापडले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर येथून लोकसभा 2019 साठी लाखोंच्या संख्येने उपस्थित जनतेच्या सोबत निवडणूक अर्ज 25 मार्च 2019 रोजी भरला. या विषयावर विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

डेलीहंटअर्काईव्ह

जेपीएन न्युजअर्काईव्ह

आपलं महानगरअर्काईव्ह

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जेव्हा लोकसभा 2019 साठी निवडणूक अर्ज भरला तेव्हा मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये प्रकाश आंबेडकर आणि आणखीन एक व्यक्ती हे दोघेच बाईकवर जाताना दिसत आहेत. परंतू बाईकवरुन जातानाचा फोटो बारकाईना अभ्यास केला असता, 25 मार्च 2019 रोजी जेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी ज्या रंगाचा शर्ट घातलेला आहे, त्याच रंगाचा शर्ट बाईकवरुन जाताना घातलेला आहे. तसेच सर्व जनतेसोबत अर्ज भरण्यासाठी निघालेल्या चारचाकी गाडीत उभे असलेले प्रकाश आंबेडकर यांनी त्याच रंगाचा शर्ट घातलेला आहे. बाईकवर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत असणारी व्यक्ती देखील चाकचाकी गाडीत आंबेडकरांच्या बाजूला उभी असताना दिसत आहे. खाली दिलेल्या फोटोत आपण स्पष्टपणे हे बघू शकता की, बाईकवर प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन जाणारा व्यक्ती आणि चारचाकी गाडीत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत उभे असणारी व्यक्ती एकच आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटोसंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडो टीमने स्वतः प्रकाश आंबेडकर यांना फोनवर संपर्क केला. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या स्वीय सहायक राजेंद्र पाटोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर यांना गर्दीतून वाट काढत सोलापूर कलेक्टर कार्यालयापर्यंत जाण्यासाठी अवघड होत होते, म्हणून एम आय एमचे सोलापूर शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्यासोबत बाईकवर सोलापूर कलेक्टर कार्यालयापर्यंतच्या गेटपर्यंत निवडणूक अर्ज भरण्यासाठी ते गेले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो प्रकाश आंबेडकर हे बाईकवरुन निवडणूक अर्ज भरण्यासाठी गेले हे तथ्य खरे आहे.

Avatar

Title:प्रकाश आंबेडकर यांनी बाईकवरुन जाऊन उमेदवारी अर्ज भरला का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: True